kaju barfi recipe google
लाईफस्टाईल

Kaju Barfi Recipe : काजू कतली कडक होतेय? मग ही परफेक्ट रेसिपी अन् टिप्स वापरुन पाहाच

Diwali Sweets Recipe : दिवाळीला नेहमीच्या फराळासोबत काहीतरी हटके बनवा. ही सोपी आणि स्वादिष्ट काजू बर्फी रेसिपी घरच्या घरी तयार करा आणि पाहुण्यांचे मन जिंका.

Sakshi Sunil Jadhav

दिवाळीसाठी सोपी आणि पारंपरिक काजू बर्फी बनवण्याची सोपी पद्धत

कमी साहित्यात बनणारी मिठाई

रोज, चॉकलेट, पिस्ता आणि केशर अशा विविध फ्लेवर्समध्ये काजू कतली

बर्फी मऊ आणि स्वादिष्ट ठेवण्यासाठी साखर पाकाचे प्रमाण योग्य असणे आवश्यक

Kaju Barfi : दिवाळी आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. सगळ्या घरांमध्ये आता फराळाच्या चर्चा रंगल्या असतील. दरवर्षी दिवाळीत करंजा, लाडू, चिवडा शंकरपाळ्या तयार केल्या जातात. यंदा तुम्ही काही हटके आणि सोपी स्वीट डीश तयार करु शकता. रेसिपी जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.

साहित्य

२ कप काजू

१ कप साखर

१ चमचा तूप

१ चमचा वेलची पूड

कृती

सगळ्यात आधी मिक्सरमध्ये २ कप काजूची बारिक पावडर तयार करुन घ्या. मग पुढे ती पावडर चाळणीने चाळून घ्या. पावडरमध्ये गुठळ्या होऊ देऊ नका. आता एका जाड कढईत साखर आणि अर्धा कप पाणी घ्या. साखर पुर्ण विरघळवून घ्या. साधारण ५ मिनिटे पाणी उकळवा. मग त्यात काजूची पावडर मिक्स करा. साहित्य एकजीव करुन घ्या त्याची पेस्ट तयार होईपर्यंत ढवळत राहा.

पुढे संपूर्ण मिश्रणाची पेस्ट होईपर्यंत ती शिजवा. जास्त शिजू देऊ नका. कारण त्याने बर्फी कडक होऊ शकते. मग बटर पेपरवर पेस्ट काढून घ्या. त्या आधी त्याला तूप लावून घ्या. मिश्रण घट्ट होण्याआधी ते चमच्याच्या मदतीने मळून घ्या. मग लाटण्याने ते एक सारखे मळून घ्या. त्याला थोडं तूप लावा आणि त्यावर सिलव्हर वर्क लावा. आता हिऱ्याच्या आकारात कापून घ्या. तुमची काजू कतली सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

तुम्ही पुढील पद्धतीची काजू कतली तयार करु शकता

१. पारंपरिक काजू कतली (Classic Kaju Katli)

पारंपरिक काजू कतली फक्त काजू आणि साखर सिरपने तयार केली जाते.

२. चॉकलेट काजू कतली (Chocolate Kaju Katli)

चॉकलेट काजू कतलीत कोको पावडर किंवा डार्क चॉकलेट मिसळलेले असते.

३. रोज काजू कतली (Rose Kaju Katli)

रोज काजू कतली गुलाब पाण्याचा वापर करून बनवली जाते.

४. केशर काजू कतली (Kesar Kaju Katli)

केशर आणि वेलचीच्या सुवासाने भरलेली ही काजू कतली असते.

५. पिस्ता काजू कतली (Pista Kaju Katli)

काजूसोबत पिस्त्याचे मिश्रण वापरून ही पिस्ता काजू कतली तयार केली जाते.

काजू बर्फी तयार करताना कोणती काळजी घ्याल?

काजूची पावडर बारिक आणि गुठळ्या नसलेली असावी.

बर्फीला मऊ टेक्स्चर कसे मिळेल?

मिश्रण थोडं ओलसर असतानाच बटर पेपरवर काढा आणि हलक्या हाताने मळा. त्यामुळे काजू कतली मऊ होईल.

काजू बर्फीमध्ये वेगवेगळे फ्लेवर्स कसे आणता येतात?

रोज वॉटर, केशर, चॉकलेट किंवा पिस्त्याचं मिश्रण घालून विविध फ्लेवर्स तयार करता येतात.

बर्फी किती दिवस टिकते?

हवाबंद डब्यात ठेवल्यास ५ ते ६ दिवस सहज टिकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! यापुढे कन्फर्म तिकिटाची तारीख बदलू शकता, कधीपासून लागू होणार नवा नियम?

Mumbai To Goa: मुंबईवरुन गोव्याला जायचे आहे? मग जाणून घ्या प्रवास करताना कोणता मार्ग सर्वोत्तम

Air India: एअर इंडियाच्या फ्लाइट तिकीटावर ६००० रुपयांचा डिस्काउंट; कोणाला मिळणार फायदा?

Maharashtra Live News Update : विमानाचं तिकीट स्वस्त मिळावं यासाठी उड्डाण योजना- पीएम मोदी

PM Narendra Modi : मुंबईला मिळालं आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ; दि. बा. पाटील यांचं स्मरण करत PM मोदी काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT