Diwali 2025: दीपोत्सव यंदा ५ नव्हे तर ६ दिवसाचा, पण कसा? वाचा A टू Z माहिती

Diwali festival: दिवाळी २०२५ यंदा पाच नाही तर सहा दिवसांची असणार आहे. धनत्रयोदशीची तिथी दोन दिवसांवर येत असल्यामुळे दीपोत्सव यंदा अधिक दिवसांचा आनंद देणार आहे.
Six Days Festival Celebration
Six Days Festival Celebrationgoogle
Published On
Summary

दिवाळी २०२५ यंदा पाच सहा दिवस साजरी केली जाणार आहे.
धनत्रयोदशीची तिथी दोन दिवसांवर येत असल्यामुळे सणाच्या तारखा वाढल्या आहेत.
१८ ऑक्टोबरपासून २३ ऑक्टोबरपर्यंत दिवाळीचा साजरी केली जाईल.
सहा दिवसांमध्ये धनतेरस, छोटी दिवाळी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज असे सण येणार आहेत.

दिवाळी २०२५ हा सण भारतात मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. ज्या प्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्टीचा हा काळ असतो. त्याचप्रमाणे दिवाळीला पाच दिवसांची सलग रजा असते. मात्र यंदा पाच दिवसांच्या ऐवजी सहा दिवस दिवाळी साजरा केली जाणार आहे. यंदा मोठी आणि छोटी दोन्ही दिवाळी एकाच दिवशी साजरी होतील. कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवसापासून शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो. पारंपारिकपणे दीपोत्सव पाच दिवसांचा असला तरी, यंदा धनत्रयोदशीची तिथी दोन दिवसांवर येणे यामुळे हा उत्सव सहा दिवसांचा झाला आहे.

यंदा दिवाळी १८ ऑक्टोबर रोजी सुरू होऊन २३ ऑक्टोबर २०२५ रोजी संपेल. १८ ऑक्टोबर शनिवार रोजी द्वादशी तिथी दुपारी १२:१९ पर्यंत राहील आणि त्यानंतर धनत्रयोदशीची तिथी सुरू होईल. ज्योतिषशास्त्रानुसार १८ ऑक्टोबर रोजी दुपारपासून रात्रीपर्यंत त्रयोदशी तिथी असल्याने या दिवशी धनतेरस साजरी करणे शुभ ठरेल.

रविवार, १९ ऑक्टोबर रोजीही त्रयोदशी तिथी दुपारी १:५१ पर्यंत राहील. या दिवशी धन्वंतरीची पूजा करून खरेदी केल्याने अनेक शुभ घटना तुमच्या आयुष्यात येतील. सोमवारी, २० ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी, किंवा छोटी दिवाळी साजरी केली जाईल. या दिवशी चतुर्दशी तिथी दुपारी ३:४५ पर्यंत राहील, त्यानंतर अमावस्या तिथी सुरू होईल. अमावस्या तिथीत प्रदोषकाळात लक्ष्मीपूजन केले जाते, त्यामुळे २० ऑक्टोबर रोजी सकाळी नरक चतुर्दशी आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन साजरे केले जातील.

Six Days Festival Celebration
Diwali 2025: दिवाळीला जेवणासाठी करा खास बेत, वाचा ५ दिवसांसाठी खास टिप्स

मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी गोवर्धन पूजा पारंपारिक वेळेनुसार होणार नाही कारण कार्तिक शुक्ल पक्षाचा पहिला दिवस असल्याने हा दिवस अमावस्या तिथीच्या सकाळपासून दुपारपर्यंत राहील. बुधवारी, २२ ऑक्टोबर रोजी कार्तिक शुक्ल प्रतिपदा तिथी असल्यामुळे लोक घरी आणि मंदिरांमध्ये गोवर्धन पूजा करतील आणि भगवान श्रीकृष्णाला अन्नकुट अर्पण करतील.

दिवाळीचा सहावा दिवस, २३ ऑक्टोबर गुरुवार रोजी, भाऊबीज साजरा केला जाईल. या दिवशी बहिणी आपल्या भावांना घरी बोलावतात, त्यांना तिलक लावतात, जेवण देतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यंदा दिवाळी फक्त पाच दिवसांची नाही तर सहा दिवसांची साजरी होणार असल्याने लोकांना उत्सवाचे आनंद अधिक दिवसांपर्यंत अनुभवता येईल.

Six Days Festival Celebration
Soft Dhokla Tips: ढोकळा सॉफ्ट होत नाही, चपटा होतोय? मग ही ट्रिक करा फॉलो
Q

यंदा दिवाळी कधी आहे?

A

यंदा दिवाळी शनिवार, १८ ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि गुरुवार, २३ ऑक्टोबरला संपेल.

Q

यंदा दिवाळी सहा दिवसांची का आहे?

A

यंदा धनत्रयोदशीची तिथी दोन दिवसांवर येत असल्याने दिवाळीचा कालावधी एका दिवसाने वाढून सहा दिवसांचा झाला आहे.

Q

सहा दिवसांच्या दिवाळीत कोणकोणते सण येतात?

A

धनत्रयोदशी, छोटी दिवाळी, लक्ष्मीपूजन , गोवर्धन पूजा, नवमी पूजा आणि भाऊबीज हे सहा दिवस दिवाळीत साजरे केले जातात.

Q

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय?

A

लक्ष्मीपूजन २० ऑक्टोबर २०२५ रोजी, अमावस्या तिथीच्या प्रदोषकाळात साजरे केले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com