Jaljeera Soda Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Jaljeera Soda Recipe: एसिडिटी अन् गॅसला झटक्यात पळवून लावणारा जलजीरा सोडा; वाचा रेसिपी

Jaljeera Soda Recipe in Marathi: उन्हाळ्यात सरबतच नाही तर तुम्ही मसालेदार जलजीरा देखील पिऊ शकता.

Manasvi Choudhary

एप्रिल- मे या उन्हाळ्याच्या दिवसात शरीराची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. या दिवसात कडाक्याच्या उन्हामुळे शारीरिक समस्या जाणवतात. अशावेळी शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सरबत पिणे आवश्यक असते.

उन्हाळ्यात शरीरातून घाम येत राहिल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवते. तसेच यामुळे शरीराला भूक कमी मात्र तहान जास्त लागते. अशावेळी थंडगार पाणी, सरबत या पेयांचे सेवन केले जाते. मात्र सरबतच नाही तर तुम्ही मसालेदार जलजीरा देखील पिऊ शकता. याच्या सेवनाने गॅस आणि अॅसिडिटी यासांरख्या समस्यांना देखील कमी होतात.

उन्हातून प्रवास केल्यानंतर अनेकांना थंडगार पेय पिण्याची इच्छा असते. उन्हाळ्यात बाहेरचे सरबत, आईस्क्रिम हे खाण्यापेक्षा घरीच जलजीरा सरबत तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया मसालेदार जलजीरा सरबत कसा बनवायचा?

मसालेदार जलजीरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पुदिना पाने 1 /2 कप

हिरवी धणे 1/4 कप

बुंदी 1/4 चमचा

बर्फाचे तुकडे 4/5

आलं 1 चमचा

चिंचेची पेस्ट 1 चमचा

काळी मिरी पावडर 1/4 चमचा

जिरे पावडर 1/2 चमचा

बडीशेप 1/2 चमचा

हिंग 1 चमचा

साखर 1 चमचा

मीठ 1/2 चमचा

लिंबाचा रस 1 चमचा

जलजीरा सरबत बनवण्याची सोपी पद्धत

जलजीर बनवण्यासाठी सर्वप्रथम आले, मिरची आणि पुदीन्याची पाने स्वच्छ धुवून बारीक वाटून घ्या.

यानंतर एका वाटीमध्ये भिजवलेले चिंच आणि वाटून घेतले मिश्रण एकत्रित करा.

या मिश्रणामध्ये थोडे हिंग, काळी मिरी पावडर, बडीशेप, जिरे पावडर, लिंबाचा रस, आणि साखर घालून मिश्रण एकजीव करा.

यानंतर या मिश्रणामध्ये थोडे पाणी टाका आणि हे चांगले मिक्स करा.

बर्फ टाकून मसालेदार जलजीर सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv : गुरुजी, आमच्या शाळेतून जाऊ नका ना! म्हणत विद्यार्थ्यांनी हंबरडा फोडला | पाहा VIDEO

Pune Crime: मंदिरात घेऊन गेला, मंत्रोच्चार करत अघोरी विधी; अंगाऱ्याचा पेढा खायला दिला, नंतर महिलेसोबत...

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला

Crime News : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती, विवाहानंतर दोन महिन्यांतच सासरकडून छळ, तरुणीचा मृत्यू

Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये जोरदार हाणामारी, बुक्क्यांनी एकमेकांना फोडलं |VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT