Fried Garlic Chutney Saam Tv
लाईफस्टाईल

Fried Garlic Chutney : फ्राईड लसणाची चटणी बनवून जेवणाची चव दुप्पट करा!

Food : साध्या जेवणासोबत चटणी आणि लोणचे असल्यास जेवण अधिक चवदार लागते.

कोमल दामुद्रे

How To make Fried Garlic Chutney : चटणी जेवणाची चव वाढवते त्यामुळे प्रत्येक रेसिपीमध्ये लसणाचा वापर केला जातो. मसूरपासून ते चिकनपर्यंत सर्व पदार्थांमध्ये लसणाची चव असते. साध्या जेवणासोबत चटणी आणि लोणचे असल्यास जेवण अधिक चवदार लागते.

बरेच लोक जेवणासोबत चटणी खाण्यास पसंत करतात. तुम्ही लसणाची चटणी खाल्ली असेलच. तर आज राजस्थानी स्टाईलमध्ये लसणाची चटणी कशी बनवतात ते जाणून घेऊ.

1. साहित्य

  • ४ सुक्या लाल मिरच्या

  • १/४ कप तूप

  • १ टीस्पून उडीद डाळ

  • 2-3 लसूण (Garlic)

  • 1 टीस्पून मोहरी

  • १/४ कप नारळ

  • 1 चिरलेला टोमॅटो (Tomato)

  • एक चिमूटभर हिंग

  • 1 कप चिंचेचे पाणी (Water)

  • 1/4 टीस्पून हळद

  • 3/4 चमचे मीठ

  • १/२ टीस्पून गूळ

2. कृती

  • लसणाची चटणी बनवण्यासाठी लसणाच्या दोन-तीन पाकळ्या सोलून घ्या.

  • त्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून घ्या

  • एक कप चिंच भिजत ठेवा नंतर खोबरे किसून घ्या.

  • आता कढईत १/४ कप तूप वितळवून त्यात १ चमचा मोहरी, १ चमचा उडीद डाळ आणि चिमूटभर हिंग टाका.

  • आता या मिश्रणात चिरलेला लसूण घाला आणि गॅस मंद आचेवर ठेवा. लसूण गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान परतून घ्या.

  • नंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

  • आता मिक्सर मध्ये किसलेले खोबरे बारीक करून द्या.

  • त्यासोबतच 1 चिरलेला टोमॅटो आणि 4 कोरड्या लाल मिरच्या घालून छान एकजीव करून पेस्ट तयार करा.

  • दुसरीकडे एका कढईत एक कप चिंचेचे पाणी, 1/4 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ आणि 1/2 चमचे गूळ पाच मिनिटे उकळून घ्या.

  • आता या पाण्यात आपण तयार केलेली नारळ आणि टोमॅटोची पेस्ट मिक्स करा आणि त्यावर तळलेला लसूण घाला.

  • आता हे मिश्रण तीन मिनिटे चांगले परतून घ्या.

  • मिश्रणावर तेल येईपर्यंत शिजवा त्यानंतर तयार आहे तुमचे तळलेल्या लसणाची चटणी.

  • ही चटणी डाळ-भातासोबत, भाकरीसोबत किंवा इतर कोणत्याही पदर्था सोबत सर्व्ह करू शकता.

3. या काही गोष्टी लक्षात ठेवा

  • लसणाची चटणी बनवण्यासाठी कधीही तयार लाल मिरची पावडरचा वापर करण्याऐवजी सुकलेल्या लाल मिरच्यांचा वापर करा त्यामुळे चटणीला चव येते.

  • चटणी बनवण्यासाठी अंकुरलेल्या लसणाचा वापर करू नका त्यामुळे चटणीची चव खरा होऊ शकते.

  • बारीक करताना जर चटणी खूप घट्ट झाली तर त्यात तुम्ही तेलाचा वापर करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

SCROLL FOR NEXT