Driving License Link To Aadhar Card Saam Tv
लाईफस्टाईल

Driving License Link To Aadhar Card : ड्रायव्हिंग लायसन्स आधारकार्डशी कसे लिंक कराल? ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रोसेस जाणून घ्या

Driving License Link : तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

Shraddha Thik

Aadhar Card Link :

तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. ड्रायव्हिंग लायसन्स (DL) हे सरगळ्यात खास कागदपत्रांपैकी एक आहे. सध्या आधारकार्ड प्रत्येक कागदपत्रांशी लिंक करणे सोयीचे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुम्ही अजून तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आधारकार्डशी लिंक केला नसेल, तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. याचा फायदा पुढे तुम्हालाच होईल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते घरी बसून ऑनलाइन लिंक करू शकता किंवा ऑफलाइन (Offline) देखील लिंक करू शकता. येथे दोन्ही पद्धती समजून घ्या.

ऑनलाइन लिंक कसे करावे?

  • तुमचा ब्राउझर उघडा आणि तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स जिथून जारी करण्यात आला होता त्या राज्यातील संबंधित रोड ट्रान्सपोर्ट पोर्टलला भेट द्या. 'Link Aadhaar' पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक (Click) करा.

  • एक ड्रॉपडाउन मेनू दिसेल. यादीतून 'ड्रायव्हिंग लायसन्स' वर क्लिक करा.

  • आता तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर इथे टाका आणि 'Get Details' वर क्लिक करा.

  • पुढील स्क्रीनवर, तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स तपशील दिसून येईल. खाली एक बॉक्स देखील दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर भरावा लागेल.

  • एकदा तुम्ही हे दोन्ही भरल्यानंतर 'Submit' वर क्लिक करा. नोंदणीकृत मोबाईल नंबरवर तुम्हाला वन-टाइम पासवर्ड (OTP) प्राप्त होईल.

  • पडताळणी पूर्ण करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या फील्डमध्ये OTP टाका. एकदा हे पूर्ण झाल्यावर, ड्रायव्हिंग लायसन्सला आधारशी लिंक करण्याची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

ऑफलाइन लिंक कसे करावे?

  • सर्वप्रथम तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) भेट देणे आवश्यक आहे.

  • येथे पोहोचल्यानंतर कर्मचाऱ्याशी संपर्क साधा आणि आधार लिंकिंग फॉर्म मिळवा.

  • आता फॉर्म भरा आणि तुम्ही भरलेला तपशील बरोबर असल्याची खात्री करा आणि ते दोनदा तपासा. लक्षात घ्या की या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा DL नंबर आणि आधार क्रमांक टाकावा लागेल, त्यामुळे ते लिहिताना काळजी घ्या.

  • यानंतर, हा पूर्णपणे भरलेला फॉर्म अधिकृत किंवा संबंधित कर्मचाऱ्याला सबमिट करा आणि त्यासोबत तुमच्या आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी अटॅच करा.

  • आरटीओकडून योग्य मूल्यमापन आणि पडताळणी केली जाईल. यशस्वी पडताळणी केल्यावर, तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर तुमचा DL तुमच्या आधार कार्डशी जोडला गेला आहे याचा कन्फर्म करणारा एसएमएस येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

Maharashtra Exit Poll: भुसावळमध्ये भाजपचे संजय सावकारे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Tongue colour Health: जिभेचा बदललेला रंग देतात 'या' गंभीर आजारांचे संकेत, तुमच्या जिभेचा रंग कोणता?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की भाजप, शिराळा विधानसभेत कोणाचं पारडं जड? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT