Aadhar Ration Card Link
Aadhar Ration Card Link Saam Tv

Aadhar Ration Card Link : आधार-रेशन कार्ड लिंकसाठी मुदत वाढवली, लिंक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

Aadhar Ration Card Link Last Date : तुमचे रेशन कार्ड आधार लिंक नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
Published on

How To Link Aadhar Ration Card Link : केंद्र सरकारने रेशन कार्डशी आधार लिंक करण्याच्या मुदती वाढ केले आहे. तुमचे रेशन कार्ड आधार लिंक नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो किंवा तुमची इतर सरकारी कामे करताना अडथळा येऊ शकतो.

केंद्र सरकारने रेशन कार्ड (Ration Card )आधारशी लिंक करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 30 जून 2023 पर्यंत होती. या आदेशाबाबत अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. एकापेक्षा जास्त शिधापत्रिका असण्यावर बंदी घालण्याच्या उद्देशाने सरकार आधारशी शिधापत्रिकेशी लिंक करण्यास सांगितले आहे.

Aadhar Ration Card Link
Aadhar Card Safety Tips : आधार कार्डधारकांनो सावधान! तुमची एक चूक अन् बँक खाते होईल रिकामे...

सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत सुरू असलेल्या रेशन दुकानांतून सरकार सर्व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना (Family) रेशनकार्डद्वारे स्वस्तात धान्य आणि केरोसीन तेल देते. पासपोर्ट, आधार आणि मतदार ओळखपत्राप्रमाणेच शिधापत्रिका देखील लोकांसाठी ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करते. अनेक लोकांकडे एकापेक्षा जास्त शिधापत्रिका असून त्याद्वारे त्यांना जास्त रेशन मिळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गरजूंना स्वस्त धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत.

रेशनकार्डशी आधार लिंक (Aadhar card) केल्यानंतर, एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त रेशन कार्डे ठेवता येणार नाहीत. तर कोणतीही व्यक्ती निश्चित कोट्यापेक्षा जास्त रेशन घेऊ शकणार नाही. याद्वारे केवळ गरजूंनाच अनुदानावर धान्य मिळेल याची खात्री केली जाईल.

Aadhar Ration Card Link
What Is Form 16 : फॉर्म 16 म्हणजे काय ? कोणत्या व्यक्तीला तो भरावा लागतो ? IT Return साठी अत्यावश्यक का ?

1. ऑनलाइन कसे कराल लिंक

  • रेशन कार्डमध्ये समाविष्ट असलेल्या स्वत:च्या व कुटुंबातील सदस्यांच्या आधारकार्डचा फोटो, कुटुंबप्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो शासकीय रेशन दुकानावर जमा करा.

  • आधार डाटाबेसची माहीती प्रमाणित करण्यासाठी तुम्हाला फिंगरप्रिंट द्यावा लागेल.

  • यानंतर, अधिकृत दस्तऐवजावर प्रक्रिया केल्यानंतर, तुम्हाला सूचित केले जाईल की तुमचे रेशन कार्ड आधारशी लिंक केले गेले आहे.

Aadhar Ration Card Link
Women Desire : वयानुसार महिलांमध्ये वाढते 'ही' इच्छा, नाही मिळालं काही तर होतात अस्वस्थ

2. आधार-रेशन कार्ड ऑनलाइन कसे लिंक करावे

  • सर्वप्रथम सार्वजनिक वितरण प्रणालीच्या पोर्टलवर जा.

  • यानंतर आधार कार्ड, रेशनकार्ड क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका. Continue बटणावर क्लिक करा.

  • तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल फोनवर OTP प्राप्त होईल

  • ओटीपी लिहिल्यानंतर रेशन आणि आधार कार्ड लिंकवर क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com