What Is Form 16 : फॉर्म 16 म्हणजे काय ? कोणत्या व्यक्तीला तो भरावा लागतो ? IT Return साठी अत्यावश्यक का ?

How to File Income Tax Return : तुमचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला आपल्या वार्षिक उत्पन्नानुसार Income Tax द्यावा लागतो.
What Is Form 16
What Is Form 16saam Tv
Published On

ITR Filing : सरकार आपल्याकडून विज बील, पाणीपट्टी, घरपट्टीच्या माध्यमांतून टॅक्स आकारत असतेच. परंतु, जर तुमचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांपेक्षा अधिक असेल तर तुम्हाला आपल्या वार्षिक उत्पन्नानुसार आयकर (Income Tax) द्यावा लागतो.

दरवर्षी या नोकरदार (Employee) करदात्यांना त्यांच्या कंपनीकडून हा टॅक्स भरण्यासाठी फॉर्म-१६ भरावा लागतो. यावर्षीचा टॅक्स भरण्यासाठी १५ जूनपासून हा फॉर्म पुरवला जाणार आहे. हा फॉर्म-१६ नोकरदार करदात्यांसाठी अतिशय महत्त्वाचा कागदपत्र असून त्यांना या फॉर्ममुळे आयकर (income tax) भरणे सोपे होते. काय आहे हा फॉर्म-१६ आणि काय आहे याचे कार्य जाणून घेऊयात सविस्तर.

What Is Form 16
EPFO Marriage Advance : लग्नाच्या खर्चाची चिंता कशाला ? पीएफ खात्यातून काढता येणार पैसे, कसे ते जाणून घ्या

1. सर्व कर्मचाऱ्यांना हा फॉर्म पुरवणे कंपन्यांना असते बंधनकारक

या फॉर्मवर कर्मचाऱ्यांचा एकूण पगार (Salary), कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात केलेली कपात आणि कंपनीकडून कापण्यात आलेला टीडीएस म्हणजे उत्पनावरील कर इत्यादी गोष्टींची माहिती दिलेली असते. आयकर कायद्याच्या २०३ कलमाअंतर्गत, कंपन्याना त्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म-१६ देणे बंधनकारक केले आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्पन्नावर कापलेल्या एकूण टीडीएसची संपूर्ण माहिती मिळते.

2. समाप्ती तारखेआधीच इनकम टॅक्स रिटर्न भरणे गरजेचे

इनकम टॅक्स भरण्याची तारीख जवळ आली असून, त्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरदाता करदाता असाल तर तुम्हाला देखील लवकरच हा फॉर्म मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा फॉर्म मिळताच त्वरीत आपला इनकम टॅक्स भरून घ्या. अजिबात विलंब करू नका. तुम्ही ३१ जुलैपूर्वी हा कर निशुल्क भरू शकता. अंतिम तारीख उलटून गेल्यानंतर वाजवी रक्कम आकारली जाते, त्यामुळे वेळेत कर भरणे फायद्याचे ठरते. यामागचे आणखी एक कारण म्हणजे तारीख उलटून गेल्यानंतर साईटवरचे ट्रॅफिक वाढून ती क्रॅश होण्याचा धोका असतो ज्यामुळे आणखी उशीर होऊ शकतो.

What Is Form 16
How To Withdraw PF Amount : घरबसल्या PF Account मधून पैसे कसे काढाल ? या प्रोसेस फॉलो करा

3. फॉर्म-१६ भरण्यापूर्वी तो वाचणे आवश्यक

तुमच्या कंपनीकडून मिळालेला फॉर्म-१६ भरण्यापूर्वी तो वाचणे व काही गोष्टींची खातर जमा करणे आवश्यक असते.

1. सर्वप्रथम आपल्या फॉर्ममध्ये आपला एकूण भत्ता नोंद केला आहे की नाही हे तपासणे गरजेचे असते.

2. दुसरी गोष्ट म्हणजे घरभाडे (HRA)कर आणि प्रवास रजा सहाय्य (Leave Travel Allowance) तपासणे आवश्यक असते. याव्यतिकरीक्त इतर ५ महत्त्वाच्या गोष्टी तपासणे देखील गरजेचे असते.

What Is Form 16
Women Desire : वयानुसार महिलांमध्ये वाढते 'ही' इच्छा, नाही मिळालं काही तर होतात अस्वस्थ

4. फॉर्म-१६ भरण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या 5 गोष्टी

1. तुमचा पॅन क्रमांक योग्य आहे की नाही हे तपासून घ्यावे. अन्यथा तुम्हाला इनकम टॅक्स रिफंडसाठी दावा करता येणार नाही.

2. आपल्या फॉर्म-१६ वरील आपला पत्ता, आपलं नाव व कंपनीचा TAN नंबर तपासून घ्यावा.

3. आपल्या फॉर्म-१६ मध्ये करण्यात आलेली कपात फॉर्म-26 AS आणि AIS सोबत जुळते आहे का नाही हे तपासावे.

4. जुन्या पद्धतीची निवड केली असेल, तर बचत कपातीचे तपशील तपासून घ्यावे.

5. २०२२-२३ या वर्षात जर तुम्ही नोकरी बदलली असल्यास, आपल्या पूर्वीच्या कंपनीकडून फॉर्म-१६ मिळवावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com