How to get rid of dehydration problem in rainy season, Dehydration problem, Health Tips in Marathi, treatment of dehydration
How to get rid of dehydration problem in rainy season, Dehydration problem, Health Tips in Marathi, treatment of dehydration ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पावसाळ्यात डिहायड्रेटच्या समस्येपासून सुटका कशी मिळवाल ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उन्हाळ्यात आपण शरीराची अधिक काळजी घेत असतो. सतत पाणी पिणे, थंड पेयाचे सेवन करुन आपण आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.

हे देखील पहा-

पावसाळ्यात आपण अधिक पाण्याचे (Water) सेवन करत नाही त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळा आणि पावसाळ्यात हायड्रेटेड राहणे फार महत्वाचे आहे. उष्णता आणि आर्द्रतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता होते. पावसाळ्यात डिहायड्रेटच्या समस्येपासून सुटका कशी मिळवाल हे जाणून घेऊया.

१. पावसाळ्यात पाणी अधिक पिणे शरीरासाठी चांगले आहे. पाण्यामुळे रक्तातील द्रवपदार्थ शरीरातील अनेक विघटक काढून टाकण्यास मदत होते. त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत होऊन बद्धकोष्ठतेचा त्रास टाळला जातो. उष्ण आणि दमट हवामानात आपण अधिकाधिक पाणी प्यायला हवे. व्यायाम करणाऱ्या लोकांनाही जास्त पाणी पिण्याची गरज आहे.

२. पावसाळ्यात आपण पुरेसे पाणी प्यायला हवे. पुरेसे पाणी प्यायल्यामुळे त्वचे संबंधित अनेक समस्येवर मात करता येते. पाणी त्वचेला हायड्रेट करण्यास देखील मदत करत असल्याने, पुरेसे पाणी प्यायल्याने कोरडी त्वचा बरी होण्यास मदत होते. त्वचेवर (Skin) सुरकुत्या आणि बारीक रेषा यांसारख्या वृद्धत्वाची चिन्हे दिसत नाहीत. पुरेसे पाणी न पिल्याने बद्धकोष्ठता होऊ शकते आणि त्वचेवर आणि केसांवर (Hair) परिणाम होतो.

३. पावसाळ्यात देखील आपण फळे आणि भाज्यांच्या रसाचे सेवन करायला हवे. पावसाळ्यात आपल्याला अधिक उष्णता जाणवत नाही पण शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आपण गुलाब आणि खस असलेली पेये घेऊ शकतो.

४. तसेच पावसाळ्यात आपण पुदिन्याच्या पानांचे सेवन करायला हवे. आपण पुदिन्यांच्या पाने बारीक करून उकळलेल्या गरम पाण्यात तासभर ठेवावे. पाणी थंड झाल्यावर त्यात लिंबाचा रस आणि बर्फ टाकून ताजेतवाने पेय तयार करा. आपण त्यात मध घालून त्याचे सेवन करु शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cibil Score: कमी झालेला सिबिल स्कोअर ७०० पार कसा कराल? 'या' टिप्स सुधारतील तुमचा स्कोअर

Ankita Lokhande: हृदयस्पर्शी कॅप्शनसह अंकिता लोखंडेने पतीसोबतचा रुग्णालयातील फोटो केला शेअर

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

SCROLL FOR NEXT