या औषधी वनस्पती आपल्या घरी आवर्जुन लावा

आपण फळभाज्या किंवा फुलांची झाडे लावण्यास अधिक प्राधान्य देतो.
Benefits of medicinal plants, gardening at home, Gardening tips and tricks
Benefits of medicinal plants, gardening at home, Gardening tips and tricks ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आपल्यापैकी बऱ्याच जणांना घरी बाग फुलवण्याची सवय आहे. काहीजण घरातील गच्चीवर लावतात तर काही झाडे लावण्यासाठी त्याची विशेष सोय करतात. (Gardening tips and tricks in Marathi)

हे देखील पहा -

आपण फळभाज्या किंवा फुलांची झाडे (Plant) लावण्यास अधिक प्राधान्य देतो. आयुर्वेदानुसार आपण घराच्या बागेत ह्या वनस्पती लावायला हव्या ज्यामुळे आपल्याला अनेक आजारांवर मात करता येईल. काही सुंदर दिसणारी झाडे लावल्यास घराच्या सौंदर्यासोबतच आरोग्यही (Health) ताजेतवाने राहते. तसेच, काही इंग्रजी औषधांमुळे आपल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्मांबद्दलची समज आणि रस दोन्ही कमी झाले. या औषधी वनस्पतींना आपण आपल्या घरात लावायला हवे.

या औषधी वनस्पतींना घरात लावा

१. कडुलिंब

कडुलिंबात असणाऱ्या गुणधर्मामुळे आपल्याला अनेक आजांरावर मात करता येते. कडुलिंबाचे सेवन केल्यास शरीर थंड (Cold) राहाते, पचनक्रिया सुधारते, थकवा दूर होतो, जखमा स्वच्छ आणि बरे करण्याचे कार्य करते, त्वचेशी संबंधित आजारांवर फायदेशीर ठरते, मधुमेहासाठी उपयुक्त व लघवीच्या समस्या दूर करण्याचे काम करते.

Benefits of medicinal plants, gardening at home, Gardening tips and tricks
अधिक काळ आलं साठण्यासाठी या टिप्स फॉलो करा

२. तुळशी

तुळशीला धार्मिक कार्यात व आयुर्वेदात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तुळशीचे सेवन केल्यास खोकल्याच्या समस्येवर आराम मिळतो, पोटातील जंतांची समस्या दूर होते, भूक आणि चव सुधारते, पचनशक्ती सुधारते, दमा आणि श्वसनाच्या आजारात आराम मिळतो, त्वचेशी संबंधित आजारांवर फायदेशीर ठरते तसेच, किडनी स्टोनवर ही फायदेशीर आहे.

३. कोरफड

कोरफड हे आपण भाजलेल्या जागी लावल्यास आराम मिळतो. कोरफडमुळे जखम भरते. कोरफडचे सेवन केल्यास शरीर थंड राहाते, पोटाशी संबंधित समस्यांवर फायदेशीर ठरते, मासिक पाळीच्या वेदनांवर प्रभावी औषध, यकृत कार्य सुधारते तसेच बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि जडपणापासून आराम मिळतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com