अधिक काळ आलं साठण्यासाठी या टिप्स फॉलो करा

अधिक काळ आलं साठवण्यासाठी या टिप्स नक्की पहा
How to store ginger long time
How to store ginger long timeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : स्वयंपाक घरातील मसाल्याच्या पदार्थापैकी एक आले आहे. आल्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. आजकाल आल्याचा वापर फारसा केला जात नसला तरी अशा अनेक भाज्या बनवल्या जातात, ज्यामध्ये आलं घातले जाते.

हे देखील पहा -

कच्चे आले (Ginger) हे हृदयासाठी फायदेशीर असून त्याच्या सेवानाने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी मदत होते. तसेच कच्च्या आल्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रितणात राहातो. आल्याची पेस्ट घालून किंवा ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी बारीक करण्याची मजा वेगळीच असते. आठवड्याभराची खरेदी करताना आपण अधिक प्रमाणात आले घेतो परंतु, ते ४-५ दिवसात खराब होऊ लागते ? अशावेळी आले अधिक काळ टिकवण्यासाठी या टिप्स (Tips) फॉलो करा.

आले कसे साठवाल?

हवाबंद पिशवीत न सोललेले आले घेऊन फ्रीजच्या ड्रॉवरमध्ये ठेवा. या हवाबंद पिशवीत अद्रकाच्या आत कोणतीही आर्द्रता आणि ऑक्सिजन पोहोचू देते नाही त्यामुळे आले खराब होणार नाही व त्याला बुरशी देखील लागणार नाही. अशा प्रकारे आपण आले साधारण २ महिने साठवू शकतो.

How to store ginger long time
चुटूकदार क्रॅनबेरीने करा अनेक आजारांवर मात !

चिरलेले किंवा सोललेले आले कसे साठवाल?

कधी कधी आपण आल्याचे तुकडे करतो किंवा ते सोलून ठेवतो परंतु, जेवण बनवताना आपल्याला आल्याची तितकी गरज लागत नाही. अशावेळी उरलेले आले वाया जाते. यावेळी आपण सोललेल्या आल्याचे तुकडे प्लास्टिकमध्ये गुंडाळून आठवड्याभर रेफ्रिजरेटमध्ये ठेवू शकतो. चिरलेले आले फ्रीजमध्ये आपण झाकून बरणीतही ठेवू शकतो. असे केल्याने ते किमान १ आठवडा टिकू शकते.

आलं गोठवाल कसे ?

आले साठवायचे असल्यास प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून आपण ते ६ महिन्यांपर्यंत साठवू शकतो. आपण सोललेले आले गोठवू शकतो. आइस क्यूब ट्रेमध्ये आले गोठवू शकतो. आल्याचे तुकडे गोठल्यावर बाहेर काढून त्याला झिप टॉप बॅगमध्ये ठेवा. किमान ३ महिने टिकण्यास मदत होते.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com