चुटूकदार क्रॅनबेरीने करा अनेक आजारांवर मात !

बेरी ही लहान आकाराची असून तिची चव ही आंबट-गोड असते.
Benefits of cranberries in Marathi, How to detox your Body
Benefits of cranberries in Marathi, How to detox your Bodyब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : अनेक औषधी गुणधर्मांनी भरलेल्या क्रॅनबेरीला पोषक तत्वांचे पॉवर हाऊस म्हटले जाते. क्रॅनबेरीमध्ये जीवनसत्त्वे (Vitamins), खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात. (Benefits of cranberries in Marathi)

हे देखील पहा -

क्रॅनबेरीला गुसबेरी म्हणूनही ओळखले जाते. क्रॅनबेरीपासून ज्यूस, सॉस, चॉकलेट बनवले जाते. बेरी ही लहान आकाराची असून तिची चव ही आंबट-गोड असते. आकाराला बोरा ऐवढी असून लाल रंगाची क्रॅनबेरी रोग्यासाठी खूपच उपयुक्त असते. यात ९० टक्के पाण्याचा (Water) साठा असून यात फायबर अधिक प्रमाणात आढळते. क्रॅनबेरीचा ज्यूस युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाबापासून मुक्त होण्यासाठी खूप उपयुक्त आहे. अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या क्रॅनबेरीचे इतर फायदे कोणते आहेत हे जाणून घेऊया.

क्रॅनबेरी खाण्याचे आरोग्य फायदे - क्रॅनबेरी खाने के फयदे

१. क्रॅनबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील वाईट विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. आपली चयापचय क्रिया दर वाढवून आपले वजन कमी (Weight loss) करण्यास मदत करते.

Benefits of cranberries in Marathi, How to detox your Body
या ड्रायफ्रुट्सचे आहारात सेवन करा,वजन कमी करण्यास होईल मदत

२. क्रॅनबेरीमध्ये असलेले पॉलीफेनॉल हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारापासून संरक्षण करते. हे हृदयाचे कार्य सुरळित करुन दाब कमी करते.

३. क्रॅनबेरी आतड्यात असलेले चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास आणि हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करते. क्रॅनबेरी खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

४. उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येत क्रॅनबेरीचे सेवन खूप फायदेशीर आहे. शरीराचा बीएमआय कमी होऊन नसांमध्ये साठलेली चरबीही वितळते. त्यामुळे शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि खराब कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

५. हाडांना मजबूत बनवण्यासाठी क्रॅनबेरीचे सेवन करु शकतो. व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियमची यात अधिक प्रमाणात असल्याने यूरिक ऍसिड कमी होऊन हाडे मजबूत होतात.

६. क्रॅनबेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला मॉइश्चरायझिंग तसेच चमकदार बनविण्यात मदत करतात.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com