Education Loan Saam tv
लाईफस्टाईल

Education Loan : टेन्शन नॉट ! पैशांच्या अडचणींमुळे शिक्षण थांबले ? उच्च शिक्षणासाठी कसे मिळवाल लोन? जाणून घ्या सविस्तर

Student Loan: वाढती महागाई व होणारा खर्च पाहाता मुलांना कोणते शिक्षण द्यावे हा पालकांना प्रश्न पडला आहे

कोमल दामुद्रे

How To Get Education Loan : अवघ्या काही दिवसांपूर्वी बारावीचा रिजल्ट लागला व येत्या काही दिवसात दहावीचा रिज्लट लागेल. अशातच मुलांसाठी अनेक करिअरच्या नव्या संधी उपलब्ध होतात. परंतु, वाढत्या महागाईमुळे व कुंटुंबाच्या परिस्थितीमुळे आपल्याला शिकता येत नाही.

सध्या सर्वत्र मुलांच्या एडमिशनविषयी पालकांची (Parents) धावपळ सुरु आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढती महागाई व होणारा खर्च पाहाता मुलांना कोणते शिक्षण द्यावे हा पालकांना प्रश्न पडला आहे परंतु, आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही देखील अशा परिस्थितीतून जात असेल तर शैक्षणिक कर्ज खूप फायदेशीर ठरेल. आजच्या काळात हे कर्ज (Loan) घेणे अधिक सोपे झाले आहे.

शैक्षणिक क्षेत्रात अनेक मुलांना शिष्यवृत्ती देखील मिळते. परंतु ज्या मुलांना त्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची फी एकाच वेळी भरता येत नाही त्यांच्यासाठी शैक्षणिक कर्ज हा एक चांगला पर्याय आहे. तुम्ही हे शैक्षणिक कर्ज कुठेही शिकण्यासाठी मिळवू शकता, मग तुम्ही भारतात शिकत असाल किंवा परदेशात. कर्जे मिळवण्यासाठी आपल्याला जवळपास सर्वच खाजगी आणि सरकारी बँकाकडून (Bank) मिळू शकते.

1. शैक्षणिक कर्ज म्हणजे काय?

शैक्षणिक कर्ज हे मदतीचे साधन आहे. जेव्हा तुम्ही तुमचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी बँक किंवा खाजगी संस्थेकडून कर्ज घेता. त्याला शैक्षणिक कर्ज म्हणतात. आपण त्याला विद्यार्थी कर्ज असेही म्हणू शकतो.

2.विद्यार्थी कर्जाचे किती प्रकार आहेत?

साधारणपणे, भारतात 4 प्रकारची शैक्षणिक कर्जे उपलब्ध आहेत-

1. करिअर एज्युकेशन लोन-

जेव्हा एखादा विद्यार्थी त्याचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी सरकारी महाविद्यालयातून कर्ज घेतो तेव्हा त्याला करिअर कर्ज म्हणू शकतो.

2. प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन-

जेव्हा एखादा विद्यार्थ्याने त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर त्यापेक्षा जास्त शिक्षण घेण्यासाठी कर्ज घेते, तेव्हा त्याला प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन म्हणतात.

3. पालक कर्ज-

जेव्हा पालक आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही बँकेकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतात, तेव्हा त्याला आपण पालक कर्ज म्हणतो.

4. अंडरग्रेजुएट लोन-

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, जेव्हा एखादा विद्यार्थी भारतात किंवा परदेशात पदवी मिळवण्यासाठी कर्ज घेतो, तेव्हा त्याला पदवीपूर्व कर्ज म्हणतात.

3. कर्ज घेण्याची प्रक्रिया कशी असते ?

  • विद्यार्थी कर्ज घेण्यासाठी, तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल

  • सर्वप्रथम चांगली बँक किंवा संस्था निवडा.

  • त्या बँक किंवा संस्थेकडून विद्यार्थी कर्जाविषयी प्रत्येक माहिती मिळवा.

  • बँकेने दिलेले व्याजदर नीट समजून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

  • बँकेने नमूद केलेल्या सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन करा.

  • सर्व काही नीट समजून घेतल्यानंतर कर्जासाठी अर्ज करा.

4. कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

  • वयाचा पुरावा

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

  • मार्कशीट

  • बँक पासबुक

  • आयडी

  • पत्ता

  • अभ्यासक्रम तपशील

  • पालक आणि विद्यार्थ्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड

  • पालकांच्या उत्पन्नाचा पुरावा

5. हे आहेत विद्यार्थी कर्जाचे फायदे

  • या शैक्षणिक कर्जाच्या मदतीने कोणताही विद्यार्थी त्याची स्वप्ने पूर्ण करू शकतो.

  • जर तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड केली तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला होतो, ज्यामुळे तुम्हाला भविष्यातही कर्ज घेणे सोपे होते.

  • कर्जातून घेतलेले पैसे परत करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल.

  • या कर्जावरील व्याजदर देखील इतर कर्जाच्या तुलनेत खूपच कमी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

SCROLL FOR NEXT