Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ! तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले

Pune News : पुण्यात शालार्थ आयडी मंजुरीसाठी १ लाखांची लाच स्वीकारताना शिक्षण उपनिरीक्षक ACB च्या जाळ्यात अडकले. २०१६ पासून विना वेतन काम करणाऱ्या सहशिक्षिकेला न्याय मिळणार का, याकडे लक्ष.
Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ!तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • शालार्थ आयडी मंजुरीसाठी अधिकाऱ्याने १ लाखांची लाच मागितले

  • शिक्षण उपनिरीक्षक रंगेहात पकडले

  • २०१६ पासून विना वेतन काम करणाऱ्या सहशिक्षिकेची वेदना

  • शिक्षण विभागातील चालू घोटाळ्यांमुळे वाढली बदनामी

पुणे शहर 'विद्येचं माहेर' घर मानलं जात. मात्र याच पुण्यात ' शालार्थ आयडी' साठी तब्बल एक लाख रुपयांची लाच घेताना शिक्षण उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रावसाहेब मिरगणे (Raosaheb Mirgane) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्याचे नाव आहे. राज्यातील शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केलेली असतानाही पैसे घेऊन शालार्थ आयडी दिला जात असल्याने शिक्षण विभाग अधिकच बदनाम होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांची पत्नी सोलापूर जिल्ह्यात एका माध्यमिक शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्यांना शालार्थ आयडी' नसल्याने त्या २०१६ पासून विना वेतन काम करत होत्या. त्यांचा शालार्थ आयडी मंजूर झाल्यानंतर त्यांना वेतन चालू होणार होते. हा शालार्थ आयडी मंजूर करण्यासाठी यातील तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचा शालार्थ आयडीचा प्रस्ताव १६ जून २०२५ रोजी सोलापूर विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथे दाखल केला होता.

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ!तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले
Shocking : बापाची हत्या केली अन् मृतदेह घरातच पुरला, दुर्गंधीनंतर लेकाचं बिंग फुटलं, संभाजीनगर हादरलं

सदरचा प्रस्ताव 'ई- ऑफिस' मार्फत विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांना सादर करण्यासाठी व तो प्रस्ताव मंजूर करून देण्यासाठी विभागीय शिक्षण उप संचालक यांच्या कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले आरोपी मिरगणे यांनी तक्रारदार यांच्याकडे १ लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. या संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे आपली तक्रार नोंदवली.

तक्रार दाखल झाल्यानंतर १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या काळात लाच मागणी पडताळणी करण्यात आली. तसेच २१ नोव्हेंबर रोजीच्या विभागीय शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या कार्यालयात झालेल्या पडताळणी दरम्यान आरोपी रावसाहेब मिरगणे, शिक्षण उपनिरीक्षक, यांनी तक्रारदाराच्या पत्नीची 'शालार्थ आयडी' मंजूर करून देण्यासाठी १ लाख रुपयाच्या लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले.

Education Department Scam : शिक्षण विभागात खळबळ!तब्बल १ लाखांची लाच घेताना बड्या अधिकार्‍याला रंगहाथ पकडले
Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

त्यानंतर शिक्षण उप निरीक्षक रावसाहेब मिरगणे यांनी २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये स्वतःच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून १ लाख रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. या घटनेनंतर रावसाहेब मिरगणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com