आजकाल प्रत्येक व्यक्ती जिन्सची पँट परिधान करतो. जिन्स घातल्यावर ती फिटिंगला व्यवस्थित असेल तरच कंफर्टेबल वाटतं. बाजारात विविध पद्धातीच्या जिन्स विकण्यासाठी आहेत. जर तुम्ही दुकानातून किंवा शोरूम, डिमार्ट आणि मॉलमधून जिन्स खरेदी केली तर तेथे एक ट्रायल रूम असतो. ट्रायल रूम असल्याने आपण तेथेच जिन्स परफेक्ट आहे की नाही हे तपासून घेतो.
काही व्यक्ती शोरुम पेक्षा स्ट्रीट शॉपिंग जास्त पसंत करतात. रस्त्यावर देखील छोट्या मोठ्या दुकानांमध्ये सुंदर आणि चांगली कॉलिटी असलेल्या जिन्स मिळतात. या जिन्स अगदी स्वस्त दरात आणि सर्वांच्या खिशाला परवडणाऱ्या असतात. त्यामुळे अनेक जण येथे जिन्स खरेदी करतात मात्र ट्रायल रूम नसल्याने अनेकदा ते चुकीच्या साइजची जिन्स निवडतात.
चुकीची जिन्स निवडल्यास ती एकतर आपल्याला जास्त लूज होते किंवा फार जास्त टाइट होते. तुमच्याबरोबर सुद्धा असं एकदा तरी नक्कीच घडलं असेल. असे झाल्यावर ती जिन्स काहीवेळा घरी अशीच पडून राहते आणि आपल्याला वापरता येत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ट्रायल रूम नसताना सुद्धा जिन्स परफेक्ट आहे की नाही हे कसं तपासायचं याची माहिती सांगणार आहोत.
पहिली ट्रिक
जिन्सची साइज परफेक्ट आहे की नाही हे तपासण्यासाठी सर्वात आधी तुमच्या कंबरेचं माप तुम्हाला माहिती पाहिजे. कंबरेचं माप माहिती नसेल तर तुमच्या हाताचे माप घ्या. जिन्सची कंबर कोपरापासून मनगटापर्यंत घट्ट बसत आहे का हे पाहा. जर जिन्स परफेक्ट बसत असेल तर समजून जा ही जिन्स तुम्हाला कंबरेत परफेक्ट बसेल.
दुसरी ट्रिक
काहीवेळा जिन्स कंबरेत व्यवस्थित असते मात्र तिची उंची कमी पडते किंवा जास्त होते. अशावेळी उंची परफेक्ट असावी यासाठी जिन्सचे दोन्ही पाय आपल्या हातात पकडून स्ट्रेच करा. जर हात पूर्ण स्ट्रेच होऊ शकत असतील तर जिन्सची साइज परफेक्ट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.