Mumbai Shopping Market: मुंबईतील ५ सर्वांत स्वस्त शॉपिंग मार्केट्स; इथे मिळतात फॅशनेबल कपडे; स्वस्तात मस्त होते खरेदी

Shopping Market List: लग्न-सराई, सण समारंभ जवळ आलेत? शॉपिंग करायची आहे? चला तर मग जाणून घेऊयात मुंबईमधील बेस्ट ५ शॉपिंग मार्केट्स.
Shopping Market List
Mumbai Shopping MarketSaam TV
Published On

शॉपिंग म्हंटले की मुलींचा जीव की प्राण. मात्र अनेकदा स्वस्तात मस्त शॉपिंग कुठे होईल हे माहित नसल्याने पंचायत होते. जायचे नेमके कुठे? गेलोच तर चांगले कपडे मिळतील का? स्वस्तात मस्त असतील का? असे अनेक प्रश्न मनात असतात. मात्र तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत. चला तर मग आज जाणुन घेऊया मुंबईतील सर्वात मस्त आणि स्वस्त अशी शॉपिंगची ठिकाणे.

Shopping Market List
Wine Shop License: जाणून घ्या...वाईन शॉपचा परवाना कसा मिळवायचा ?

१) कुलाबा कॉजवे -

मुंबईतील कुलाबा कॉजवे हे स्ट्रीट शॉपिंगसाठी सर्वांत लोकप्रिय मार्केट आहे. या मार्केटमध्ये ट्रेंडी कपडे, रेग्युलर टि-शर्ट, फॅन्सी टॉप्स, पार्टीवेअर ड्रेसेस, फॅशनेबल शूज, चप्पल, दागिने तसेच अनेक वस्तू मिळतात. कुलाबा कॉसवे मार्केटमध्ये प्रत्येक गरजेच्या वस्तूचे भांडार आहे. या मार्केटमध्ये स्वस्तात मस्त अशा सगळ्या वस्तू मिळतात.

२) हिल रोड -

हिल रोड मार्केट हे मुंबईच्या बांद्रा इथे आहे. हिल रोड मार्केट शॉपिंग हब म्हणून प्रसिद्ध आहे. या मार्केटमध्ये अगदी 100 रुपयांपासून कपडे मिळतात. बांद्रा स्टेशनपासून 20 मिनिटांच्या अंतरावर हे मार्केट आहे. वेस्टर्न कपड्यांसाठी हिल रोड मार्केट विशेष प्रसिद्ध आहे. शिवाय या मार्केटमध्येे ऑक्सिडाइड ज्वेलरीही छान मिळते.

३) क्रॉफर्ड मार्केट -

क्रॉफर्ड मार्केट हे मुंबईतील सर्वात स्वस्त मार्केट आहे. या मार्केटमध्ये कपडे, ब्युटी प्रोडक्टपासून सगळेच अगदी स्वस्तात मस्त मिळते. या मार्केटमध्ये कपडे, फ्रेश प्रॉडक्ट्स, शूज, सौंदर्यप्रसाधनं आणि भेटवस्तूंसह अनेक गोष्टी मिळतात. शिवाय तुम्ही जर प्राणी, पक्षी प्रेमी असाल तर मार्केटमधून तुम्ही वेगवेगळ्या रगांचे पक्षी, वेगवेगळ्या प्रजातींचे श्वान, मांजरी घेऊ शकतात. याशिवाय इलेक्ट्रॉनिक साधने देखील अतिशय स्वस्त दरात मिळतात.

४) लोखंडवाला मार्केट -

लोखंडवाला मार्केट हे मुंबईच्या अंधेरी परिसरात आहे. जर तुम्ही कमी खर्च करून जास्त खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मुंबईतील लोखंडवाला मार्केट तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. या मार्केटमध्ये तुम्ही कपड्यांपासून ते चप्पालपर्यंत सर्व काही खरेदी करू शकता.

५) नटराज मार्केट -

मुंबईच्या मलाडमधील नटराज मार्केट हे पारंपरिक कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. साड्यांचे विविध ट्रेंड या माार्केटमध्ये पाहायला मिळतील. घागरा-चोळीच्या फॅब्रिकपासून ते शिवलेल्या ट्रेंडी ब्लाऊजपर्यंत विविध गोष्टी या मार्केटमध्ये तुम्हाला खरेदी करता येतील. जर तुमच्यात बर्गेनिंगची कला असेल तर मग विषयच संपला. अगदी स्वस्तात तुम्ही या ठिकाणी शॉपिंग करू शकता. खास करून साड्यांसाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे.

आता तुम्ही शॉपिंगचा विचार करत असाल किंवा लग्न सोहळ्यासाठी तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर याठिकाणी नक्की भेट द्या. दागिन्यांपासून , कपडे, चप्पल इतकेच नाही तर अगदी सुंदर सुंदर असे गिफ्टही तुम्ही येथून घेऊ शकता.

Shopping Market List
Umbrella and Raincoat Shopping : पावसाळ्याच्या शॉपिंगसाठी मुंबईतील खास मार्केट; छत्री आणि रेनकोट फक्त २५० रुपयांत!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com