ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतातील विविध भागात तुम्हाला दारुची अनेक दुकाने दिसतात.
पण तुम्हाला माहिती आहे का दारुचे दुकान उघडण्यासाठी परवाना आवश्यक असतो.
चला तर पाहूयात दारु दुकानाचा परवाना कसा आणि कुठे मिळवायचा.
भारतात दारुचा परवाना काढण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च लागतो तसेच परवाना मिळवणे सोपे काम नाही.
परवाना मिळवण्यासाठी पहिल्यांदा उत्पादन शुल्क विभागात परवानगीसाठी अर्ज करावा लागतो.
ऑफलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असल्यास उत्पादन शुक्ल विभागाच्या कार्यालयात जावे लागत असून तिथल्या रिलेशन ऑफिसरशी बोलावे लागते.
यानंतर तुम्हाला तुमच्या जवळील महानगरपालिका किंवा नगरपालिकेकडून दुकानाचा परवाना तसेच जीएसटी क्रमांकही घ्यावा लागतो.
दारुच्या दुकानाची नोंदणी एमएसएमईकडे कारवी लागते त्यानंतर एमएसएमई प्रमाणपत्रही घ्यावे लागते.
मद्यविक्री संबंधित जे काही असेल त्यासंबंधित उत्पादन शुक्ल विभाग वेगवेगळ्या किंमतीवर वेगवेगळे परवाने देते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही