ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाला आपली त्वचा चमकदार आणि निरोगी राहावी असे वाटते.
त्यासाठी रात्री झोपताना प्रत्येकजण नाइट स्किन केयर रुटीन फॉलो करत असतो.
मात्र दिवसभर फ्रेश दिसण्यासाठी सकाळी उठल्यानंतर तुम्हीही या मॉर्निंग स्किन केयर रुटीन टीप्स फॉलो करा.
सकाळी उठल्यानंतर एका चांगल्या क्लिंझिंग ऑईलने चेहरा स्वच्छ धुवा.
तुमची त्वचा जर संवेदनशील असल्यास तुम्ही वॉटरबेस क्लिंझरचा वापर करु शकता.
क्लिंझिंगच्या वापरानंतर त्वचेला टोनिंग करणे गरजेचे असते त्यामुळे टोनरच्या मदतीने त्वचेवर असलेले अतिरीक्त तेल निघून जाते.
त्वचेवर टोनर लावण्यानंतर त्वचा चमकदार होण्यासाठी सीरम लावणे गरजेचे आहे.
त्वचा मऊ राहण्यासाठी मॉइस्चराईझ लावणे गरजेचे आहे.
सगळ्यात शेवटला त्वचेवर सनस्क्रीन लावण्यास विसरु नका यामुळे त्वचा टॅन होत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.