Andheri Fire: ब्रेकिंग! अंधेरी पंप परिसरात भीषण अग्रितांडव; दारूचे दुकान जळून खाक

Andheri Fire News: पंप हाऊस परिसरात असलेल्या एका दारू दुकानाला ही आग लागली. या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसून दारु दुकान जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Andheri Fire News:
Andheri Fire News:Saamtv

मुंबई, ता. २ मे २०२४

मुंबईमधून एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील पंप हाऊस परिसरात मोठी आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. पंप हाऊस परिसरात असलेल्या एका दारू दुकानाला ही आग लागली. या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नसून दारु दुकान जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील पंप हाऊस परिसरात मोठी आग लागल्याची दुर्घटना घडली. आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास बंद असलेल्या दारु दुकानात ही आग लागली. दारूत असलेल्या अल्कोहोलमुळे आग अधिक पसरू लागली. यावेळी गस्तीवर असलेल्या विवेक लोबे या पोलीस शिपायाच्या लक्षात येताच ताबडतोब अग्निशमन दलाला फोन करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले.

वाईन शॉपच्या आजूबाजूला झोपडपट्टी असल्यामुळे अदानी इलेक्ट्रिसिटीकडून त्वरित या ठिकाणी चा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही. या आगीमध्ये दुकानातील माल जळून खाक झाला आहे.

Andheri Fire News:
Sharad Pawar: PM मोदींकडून पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा; लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू... शरद पवारांचे टीकास्त्र

दरम्यान, पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बायकोसोबत झालेल्या वादातून सासरवाडीत आलेल्या जावयाने सासूच्या दुचाकीसह रस्त्यावर पार्क केलेल्या तब्बल १५ दुचाकी पेटवल्या. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या वडगाव बुद्रुक येथील ज्ञानगंगा इमारती समोरील पार्किंगमध्ये ही घटना घडली.

Andheri Fire News:
Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com