Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?
Who is Shashank Rao Google

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?

Who is Shashank Rao: लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शशांक राव यांच्या भाजपमध्ये प्रवेश झाल्याने भाजपला मोठी नवीन ताकद मुंबई शहरात मिळालीय.

Who is BEST workers union leade Shashank Rao : मुंबई शहरातील सर्वात मोठे ऑटो आणि बेस्ट कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शशांक राव यांच्या भाजपमध्ये प्रवेश झाल्याने भाजपला मोठी नवीन ताकद मुंबई शहरात मिळालीय. पंतप्रधान मोदी यांच्या काम करण्याच्या पद्धतीने आपण प्रोत्साहित झाल्याने भाजपात प्रवेश करत असल्याचं शशांक राव म्हणालेत.

"मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रेरणा मिळालीय आणि त्यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. तसेच यामुळे आता कामगारांचे प्रश्न सोडवणे आणि आमच्या मागण्या पूर्ण करणे सोपे होईल," असं शशांक राव भाजपमध्ये प्रवेश करतेवेळी म्हणाले. यावेळी, खासदार पीयुष गोयल, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाळ शेट्टी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. दरम्यान शशांक राव यांनी जानेवारी महिन्यात जनता दल युनायटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

कोण आहेत शशांक राव?

राव हे मुंबई ऑटो रिक्षा युनियन आणि शहरातील बेस्ट वर्कर्स युनियनचे प्रमुख आहेत. शशांक राव यांनी दिवस ऑटो रिक्षा युनियनचा संप यशस्वी करत त्यांनी त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं होतं. शशांक राव हे कामगार संघटनेचे नेते शरद राव यांचे पुत्र आहेत. आठ वर्षांपूर्वी शशांक राव यांनी त्यांच्या पदार्पणातच मोठ्या ऑटो रिक्षा युनियनच्या संपाचे नेतृत्व करत ते यशस्वी केले होते.

शरद राव यांच्या नेतृत्वाचे साक्षीदार असलेल्या युनियनच्या दिग्गज कामगारांनाही सध्या सुरू असलेल्या बेस्ट कामगारांच्या संपात युनियनचा नेता म्हणून त्यांच्या मुलाची उंची वाढल्याचे जाणवले आहे. बेस्ट, बीएमसी, हॉकर्स, ऑटो आणि टॅक्सी ड्रायव्हर्स युनियनच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या संपात शशांक राव यांनी यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय.

Who is Shashank Rao: बेस्ट स्ट्राईक, ऑटो युनियनचा झंझावती आवाज शशांक राव आहेत तरी कोण?
Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com