Sleeping Problems Saam Tv
लाईफस्टाईल

Sleeping Problems: रात्री झोप लागत नाही, अस्वस्थपणा जाणवतो? निद्रानाशावर हे फळ ठरेल रामबाण!

कोमल दामुद्रे

Sleep Problems Treatment : झोप ही माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा व दैंनदिन नित्यक्रम. बदलेल्या जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याच्या सवयी, चहा-कॉफीचे प्रमाण, जंक फूड, कामाचा अतिताण व रात्री उशीरापर्यंत काम करण्याची सवय यामुळे आपल्या झोपेचे गणित बिघडते.

निद्रानाशाचा आजार हा तरुण वयात वाढत्याप्रमाणात दिसून येत आहे. झोप न येण्याच्या समस्येला निद्रानाश म्हटले जाते. रात्रभर आपण इथली कूस तिथे बदल राहातो. सतत घड्याळाकडे बघत बसतो किंवा डोक्यात काहीबाही विचार सुरु होतात अशावेळी आपल्याला काहीच कळत नाही. दुसऱ्या दिवशी याचा परिणाम आपल्या कामावर होतो. परंतु, या आजारावर आम्ही तुम्हाला रामबाण उपाय सांगणार आहोत. जाणून घेऊया त्याबद्दल

स्लीप फाऊंडेशननुसार, किवी (Kiwi) खाल्ल्याने तुम्हाला झोप येऊ शकते. त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे शरीराला आराम करण्यास आणि झोपेचे हार्मोन वाढविण्यास मदत करतात. किवीमध्ये लोह आणि फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे तणाव (stress) कमी करण्यास मदत करते.

1. ध्यान

ध्यान हे मनाला शांत करण्यासाठी जुने तंत्र आहे. हे हार्मोन्सचे असंतुलन सुधारते. त्यामुळे निद्रानाश, तणाव आणि चिंता संपतात.

2. सूर्यप्रकाश घ्या

सकाळी सूर्यप्रकाश घेतल्याने सॅर्कडियन लय सुधारते. हे शरीराला कधी उठायचे आणि कधी झोपायचे याचे संकेत देते. हे दिवसा अधिक लक्ष केंद्रित आणि सतर्क राहण्यास मदत करते.

3. दिवसा झोपू नका

जर तुम्हाला रात्री लवकर झोपायचे असेल तर दिवसा झोपणे टाळा. कारण यामुळे शरीराला आवश्यक विश्रांती मिळते आणि ते पुन्हा कित्येक तास चपळ होते.

4. खोलीचे तापमान योग्य ठेवा

झोपेसाठी खोलीचे तापमान खूप महत्त्वाचे असते. ते खूप थंड किंवा खूप गरम नसावे. यामुळे तुम्हाला झोपायला लागताच झोप येईल.

5. मोबाईल दूर ठेवा

रात्री झोपण्याच्या किमान २ तास आधी मोबाईलचा (Mobile) वापर बंद करावा. कारण त्यातून निघणारा निळा प्रकाश झोपेच्या हार्मोनमध्ये व्यत्यय आणतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT