What are the Causes Diabetes and what are the precautions Saam TV
लाईफस्टाईल

What Causes Diabetes: 'या' चुकांमुळे तुम्हालाही होऊ शकतो डायबिटीज; आताच सावध व्हा

Diabetes Causes and Precautions: अनेक केसेसमध्ये पालकांना डायबिडीज असल्यास मुलांनाही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा त्रास होतो. मात्र या त्रासापासून वाचण्यासाठी आजपासून या गोष्टींचं पालन करा.

Ruchika Jadhav

डायबिडीजच्या समस्या दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढत चालल्या आहेत. आजकाल फक्त पन्नाशी ओलांडलेल्या व्यक्तींनाच नाही तर अगदी तरुण मुला-मुलींना देखील डायबिटीज असल्याचं दिसत आहे. अनेक व्यक्तींच्या पालकांना डायबिडीज असल्यास मुलांनाही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याचा त्रास होतो. मात्र या त्रासापासून वाचण्यासाठी आजपासून या गोष्टींचं पालन करा.

कार्बोहायड्रेट पदार्थांचं सेवन कमी करा

ब्रोकोली, केळी, बारीक गहू, गुलाब जामून, बटाटे अशा काही फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये जास्तप्रमाणात कार्बोहायजड्रेट असतं. त्यासह यामध्ये जास्त स्टार्च असलेल्या पालेभाज्यांचाही समावेश असतो. जर तुम्ही असे पदार्थ खात असाल तर त्याने तुमच्या शरीरातील कार्बोहायड्रेट वाढेल. आरोग्यासाठी ते चांगले असते. मात्र त्याचे प्रमाण जास्त वाढल्यास आरोग्यासाठी हा धोका देखील असू शकतो. त्यामुळे कार्बोहायड्रेट पदार्थांचं सेवन नियंत्रीत करा.

६-७ च्या आधी जेवण करा

कामाच्या गोंधळात अनेक व्यक्ती आपल्या जेवणाच्या वेळा निट पाळत नाहीत. त्यामुळे देखील त्यांना डायबिटीस होऊ शकतो. ज्या व्यक्ती सायंकाळी सूर्य पूर्णता मावळ्याआधी जेवण करतात त्यांना आयुष्यात कधीच डायबिटीज होत नाही. त्यामुळे तुम्ही देखील डायबिटीजपासून दूर राहण्यासाठी ६-७ च्या आधी जेवण केलं पाहिजे.

दररोज सकाळी व्यायाम करा

व्यायाम केल्याने आपल्या शरिराची आणि स्नायूंची व्यवस्थीत हालचाल होते. रात्रभर झोपल्यानंतर शरीराची काहीच हालचाल होत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर अंघोळी आधी काहीवेळ व्यायाम नक्की करावा. याने तुमचा संपूर्ण दिवस छान जाईल. तसेच डायबिटीजपासून तुम्ही स्वत:ला दूर ठेवू शकाल.

तेलकट पदार्थ खाऊ नका

अनेक व्यक्ती रोजच्या जेवणात साधं जेवण खाण्याऐवजी बाहेरचे तळलेले पदार्थ खातात. याने शरीरातील फॅट मोठ्याप्रमाणावर वाढतं. त्यामुळे बाहेरचे तळलेले तेलकट पदार्थ पिज्जा आणि बर्गर खाण्यावर नियंत्रण ठेवा.

टीप : ही फक्त सामान्या महिती आहे. वरिल पदार्थ खाल्ल्याने डायबिडीज खरोखर नियंत्रणात राहिली असा दावा साम टीव्ही करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

Mhada Home Price: खुशखबर! म्हाडाच्या घरांच्या किंमती आणखी कमी होणार; सरकारच्या नेमका प्लान काय?

Anger Control Tips: पटकन राग येतो अन् चिडचिड होतेय? ट्राय करा 'हा' उपाय, लगेच मन होईल शांत

Maharashtra Live News Update: नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

सरकारी महिला कर्मचाऱ्यासोबत रिक्षा चालकाचे गैरकृत्य; नको तिथे स्पर्श अन् शिवीगाळ, पोलिसांनाही धमकावलं

SCROLL FOR NEXT