ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल खाण्या पिण्याच्या चूकिच्या सवयींमुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात.
शरीरातील हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे तणाव आणि मुड स्विंग्स सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
हार्मोन्स संतुलित करण्यासाठी तु्मही काही घरगुती उपाय करू शकता.
डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते. त्यासोबतचं शरीरात एंडोर्फिन हार्मोन्सची पातळी वाढण्यास मदत होईल.
आहारात खोबरेल तेलाचे सेवन केल्यास शरिरातील हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.
ग्रीन टी आरोग्यासाठी खुप फायदेशीर ठरते. रिकाम्या पोटी ग्रीन टी प्यायल्यामुळे मुड स्विंग्सच्या समस्यांपासून आराम मिळतो.
आळशीच्या बियाण्यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असते ज्यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित रहाण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.