Diabetes Tips, High Blood Sugar Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Blood Sugar Tips : थंडीच्या दिवसात ब्लड शुगर वाढवतात ‘या’ गोष्टी; तुमच्या दैनंदिन सवयींकडे वेळीच लक्ष द्या

Diabetes Management Tips : थंडीच्या दिवसात डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना ब्लड शुगर लेवल कमी करण्याचा सल्ला देत असतात. त्यासाठी दैनंदिन जीवनात काही महत्वाचे आणि साधे बदल करणे आवश्यक आहे.

Saam Tv

थंडीच्या दिवसात डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना ब्लड शुगर लेवल कमी करण्याचा सल्ला देत असतात. त्यासाठी दैनंदिन जीवनात काही महत्वाचे आणि साधे बदल करणे आवश्यक आहे. थंडीमध्ये ग्लूकोज पातळी वाढते त्याने फक्त मधुमेहाचे रुग्ण नाहीतर सगळेच आळशी होतात किंवा त्यांच्या कामाचा वेळ मंदावतो. याने ब्लड शुगर लेवल वाढते आणि तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो.

हिवाळ्यात ब्लड शुगर वाढण्याची मुख्य कारणे

फिजिकल एक्टिविटी कमी होणं - थंडीच्या दिवसात लोक सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत जास्त हालचालींची कामे करत नाहीत. त्यामुळे शरीरातल्या ग्लूकोजचे कार्य कठीण होते.

हिवाळ्यात खाल्ले जाणारे पदार्थ

जानेवारीच्या महिन्यात थंडी वाढत असते.त्याच वेळेस लग्नाचे मुहूर्त अनेक असतात. तेव्हा आपण जे विविध पदार्थ खातो त्याने शरीरातल्या कॅलेरीजचं प्रमाण वाढतं.

स्ट्रेस हार्मोन्स

थंडीच्या दिवसात शरीर त्याच्या प्रतिक्रीयेनुसार स्ट्रेस हार्मोन्स तयार करतात. त्यामुळे रक्त शर्करेचे प्रमाण वाढायला सुरूवात होते.

व्हिटॅमिन डीची कमतरता

हिवाळ्यात जे लोक कमी उन्हात जातात त्यांना व्हिटॅमिन डीची कमतरता भासत असते. मात्र याचं एक वेगळं कारण म्हणजे हिवाळ्यात जास्त ऊन येत नाही.

आजार

हिवाळ्यात थंडीचे वाढते आणि नाक सतत गळायला सुरूवात होते. त्याच सोबत ताप, खोकला या आजारांचे प्रमाण वाढायला लागतं. त्याने तुम्हाला आराम घ्यावा लागतो आणि तुमची जास्त हालचाल होत नाही. त्याचसोबत तुमच्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण सुद्धा वाढायला लागतं. सनबर्न, बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकेज्ड मिठाई, कॉफी, नाश्ता न करणे, डिहायड्रेशन, नाकातला स्प्रे आणि हिरड्यांचे आजार इत्यादी आजार होण्याची शक्यता असते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Export: बांगलादेशात पाकिस्तानाचा कांदा; भारतीय शेतकऱ्यांचा वांदा,केंद्र सरकारच्या धोरणानं शेतकऱ्यांना पुन्हा रडवलं

गुंड गजा मारणेला पुण्यात बंदी, जामीन मिळाला, पण... VIDEO

आधारकार्ड आता जन्मतारखेचा पुरावा नाही; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती ही पॉलिटिकल ऍडजेस्टमेंट

BJP MLA Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT