Symptoms of bad cholesterol saam tv
लाईफस्टाईल

How to control bad cholesterol: वाईट कोलेस्टेरॉलवर नियंत्रण कसं मिळवाल? जाणून घ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन

आजच्या धावपळीच्या जीवनात उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) ही एक सामान्य समस्या बनली आहे. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असते: चांगले (HDL) आणि वाईट (LDL). शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास हृदयविकाराचा (Heart Disease) धोका वाढतो.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. हृदयाच्या आरोग्याला असलेल्या धोक्यांचा विचार करताना, सामान्य लोक ज्याला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणून ओळखतात त्या एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी, हे चिंतेचं प्रमुख कारण मानले जाते. आनुवंशिकतेने येणारा किंवा वयोमानानुसार होणारे हृदयरोग आपल्या हातात नसतात पण एलडीएल कोलेस्टेरॉल (एलडीएसली) मात्र सक्रियपणे व्यवस्थापित केले जाऊ शकते आणि डॉक्टरांद्वारे शिफारस केल्या जाणाऱ्या स्तरावर राखले जाऊ शकते.

एलडीएलसीचा स्तर वाढल्यामुळे धमन्यांमध्ये चरबीचे थर जमा होतात आणि अडथळे निर्माण होऊन रक्तप्रवाहावर निर्बंध येतात. याची परिणती हृदयविकार आणि स्ट्रोकच्या झटक्यांमध्ये होऊ शकते. म्हणूनच एलडीएलसीचे प्रमाण आटोक्यात राखणं आणि ते आवश्यक तेवढ्याच स्तरावर राखणं महत्त्वाचं आहे.

चाचणीचे निकाल हाती आल्यानतरची पुढची पायरी म्हणजे व्यक्तीनुरूप सल्ल्यासाठी कार्डिओलॉजिस्टना भेटणं. आरोग्यसेवा देणारे डॉक्टर एलडीएलसीच्या लक्ष्यांचा अंदाज बांधतील, विशेषत: रुग्णाला किती धोका आहे हे समजून घेऊन ते लक्ष्य निश्चित करतील. एलडीएलसी लक्ष्य हे वैश्विक नसतं. ते रुग्णानुसार बदलते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

रुग्णाचं वय, आनुवांशिकता, जीवनशैली, अन्य सहव्याधी यांच्या आधारे डॉक्टर लक्ष्य निश्चित करतात. विशेषीकृत मार्गदर्शनाद्वारे रुग्णाच्या विशिष्ट आरोग्यविषयक गरजा व धोके यांच्यानुसार कोलेस्टेरॉल व्यवस्थापन योजना तयार केली जाते. यांत व्यक्तीचे स्वत:चे प्राधान्यक्रम, आवश्यकता, सांस्कृतिक संदर्भ व जीवनशैलीशी निगडित घटक लक्षात घेतले जातात.

मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलमधील कार्डिओलॉजिस्ट डॉ. झाकिया खान सांगतात, “वाढलेल्या एलडीएल कोलेस्टेरॉलवरील उपचार लवकर झालेल्या निदानासह सुरू होतात. लिपिड प्रोफाइल हे सुलभ साधन आहे आणि प्रत्येकाने दैनंदिन आरोग्य तपासणीत त्याचा समावेश केला पाहिजे. एलडीएल कोलेस्टेरॉल वाढल्याचे निदान झाल्यानंतर उपचारांमध्ये तपशीलवार योजनेचा अवलंब करणे आवश्यक आहे. वाढत्या कोलेस्टेरॉलकडे लक्ष देणे का आवश्यक आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे कसे धोक्याचे आहे हे स्पष्ट करून सांगण्यासाठी रुग्णाचे समुपदेशन करणे गरजेचे असते.

समतोल पोषण, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांसाठी जीवनशैलीत आवश्यक ते बदल करणे आवश्यक असते. दर काही महिन्यांनी लिपिड प्रोफाइल करत राहिल्यास उपचारांचा परिणाम होत असल्याची निश्चिती होते. औषधे काटेकोरपणे घेतली पाहिजेत आणि ही औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. एलडीएल नियंत्रणात आल्यानंतर औषधे घेणे बंद केल्यास ते पुन्हा वाढू शकते. रुग्णांनी कोलेस्टेरॉलवरील उपचारांकडे आयुष्यभराची बांधिलकी म्हणून बघणे गरजेचे आहे. शिस्त आणि सातत्य यांच्या माध्यमातून एलडीएल प्रभावीरीत्या व्यवस्थापित करणे आणि हृदयविकार व पक्षाघाताचे झटके टाळणे पूर्णपणे शक्य आहे.”

उपचारांची पद्धतही गेल्या काही वर्षांत बदलली आहे आणि त्याचे परिणाम एलडीएल कोलेस्टेरॉल व्यवस्थापनात दिसून येत आहेत. पूर्वी मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये एलडीएलसीचा स्तर १३० एमजी/डीएलच्या वर गेल्यास तसेच मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्ये हा स्तर १६० एमजी/डीएलच्या वर गेल्यास औषधे दिली जात होती. अनेकदा लोकांना यातील बदलांची माहिती दिली जात नाही, त्यामुळे केवळ धोकादायक स्थितीतील रुग्णांनाच औषधे दिली जातात असे समजले जाते.

हृदयाची काळजी घेण्याची सुरुवात आहार व जीवनशैलीतील बदलांपासून होऊ शकते. फळे-भाज्या तसेच पूर्ण धान्यांनी समृद्ध असलेला आहार घेतल्यास हृदयाच्या एकंदर आरोग्यासाठी ते उत्तम ठरते, असे समजले जाते. वैविध्यपूर्ण पोषकांचा समावेश असलेले समतोल जेवण ही तर नेहमीच चांगली सवय आहे. मेदयुक्त अन्नपदार्थ खातानाही त्यांच्या प्रमाणाबद्दल तसेच अन्नाच्या स्वच्छतेबद्दल जागरूक राहिल्यास कार्डिओव्हस्क्युलर आरोग्यासाठी ते चांगले असते. एकंदर आरोग्य, अन्नाची निवड, सांस्कृतिक संदर्भ अशा अनेकविध घटकांचा विचार करून आरोग्यतज्ज्ञ आपल्याला सर्वांत अनुकूल असा आहार निश्चित करू शकतात.

आरोग्याला पूरक असे वजन राखणेही हृदयाच्या एकंदर आरोग्यासाठी आवश्यक आहे. अतिरिक्त वजन, मग ते अगदी काही किलो अतिरिक्त का असेना, कोलेस्टेरॉलवर परिणाम करू शकते. अतिरिक्त वजनामुळे एलडीएल कोलेस्टेरॉलचा स्तर वाढू शकतो. मध्यम तीव्रतेचा व्यायाम सातत्याने करत राहिल्यास आरोग्यात चांगला बदल घडून येऊ शकतो आणि एलडीएलसी स्तर कमी करण्यासही मदत होते. अधूनमधून केलेला व्यायामही चांगले चांगले परिणाम घडवून आणतो. शारीरिक हालचाल, स्ट्रेंग्थ ट्रेनिंग आणि कार्डिओ ट्रेनिंग यांमुळे एचडीएल कोलेस्टेरॉलची पातळी सुधारल्याचे दिसून आले आहे. एचडीएल कोलेस्टेरॉल हे ‘गुड कोलेस्टेरॉल’ समजले जाते, ते इंद्रियांमधून एलडीएल कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करते.

तरीही केवळ व्यायाम हा वाढलेल्या कोलेस्टेरॉलपासून सुरक्षित करणारा उपाय ठरू शकत नाही हे लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे. पराकोटीची शारीरिक तंदुरुस्ती म्हणजेच परिपूर्ण आरोग्य असे गृहीत धरणे चुकीचे आहे. अगदी उच्चस्तरीय क्रीडापटूंमध्येही एलडीएलची पातळी वाढलेली दिसून आलेली आहे. क्रीडापटूंमधील आकस्मिक मृत्यूंमागे कार्डिअॅड डेथ (एससीडी) हे वैद्यकीय कारण मोठ्या प्रमाणात आढळते. कठोर व्यायामाची सवय व आरोग्यपूर्ण आहार हे हृदयविकारांपासून संरक्षण करण्यासाठी पुरेसे नाही. एलडीएलसी स्तराचे व्यवस्थापन करण्यात आणि त्यायोगे आरोग्यपूर्ण जीवनशैली राखण्यात औषधांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिंदे गावातील पुरात अडकलेल्या नागरिकांचं धोकादायक स्थितीतून रेस्क्यू

आम्ही एकत्रच! शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र; बॅनर पुण्यात, पण चर्चा महाराष्ट्रात | VIDEO

Horoscope Tuesday: व्यवसायात होणार फायदा, ५ राशींना मंगळवार पावणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

Beed Floods: बीड अन् लातूरामध्ये पावसाचा हाहाकार, पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू; पाहा फोटो

Jalgaon Guru Samman :'गुरुसन्मान' निमित्ताने जळगावात रंगला नाट्यकलावंतांचा मेळा

SCROLL FOR NEXT