Lakshmi Silver Idols Clean Tips Saam TV
लाईफस्टाईल

Lakshmi Silver Idols Clean Tips : लक्ष्मी देवीची चांदीची मूर्ती काळी पडली आहे? या टिप्सने आजच चकचकीत करा

Silver Idols Clean Tips : घरातील चांदीचे दागिने तसेच चांदीची मूर्ती स्वच्छ करण्यासाठी या घरगूती टिप्स नक्की फॉलो करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळीला आजपासून सुरुवात झाली आहे. घरोघरी आज वसुबारस साजरा केला जात आहे. उद्या धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. लक्ष्मी म्हणजेच धनदौलत आणि संपत्ती. आपले घर कायम संपत्तीने समृद्ध असावे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. अनेक व्यक्तींच्या घरांमध्ये लक्ष्मी देवीची मूर्ती हमखास पाहायला मिळते. प्रत्येकाच्या आवडीनुसार प्रत्येक जण मूर्ती खरेदी करत असतो.

काही व्यक्तींच्या घरांमध्ये सोन्याचे देव असतात. तर काही व्यक्तींच्या घरामध्ये चांदी आणि तांबे पितळेच्या पंचधातूपासून बनवलेल्या मूर्ती देखील असतात. आता दिवाळी सणानिमित्त लहान आकाराच्या मूर्ती सर्वजण बाहेर काढतात आणि स्वच्छ धुऊन पूजेसाठी तयार करतात. आता जर चांदीचा धातूपासून बनवलेली मूर्ती असेल तर ती काही प्रमाणात काळी होते. चांदी हा असा धातू आहे जो हवेच्या संपर्कात जास्त आल्यावर काळा पडतो. आपण चांदीचे दागिने घालतो तेव्हा ते आपल्या अंगावरती असतात त्यावेळी काळे पडत नाहीत. मात्र एखाद्या पिशवीत अथवा डब्बिमध्ये हे दागिने ठेवल्यास ते काही दिवसांनी काळे पडतात.

चांदीचे काळे पडलेले दागिने त्याचप्रमाणे मूर्ती स्वच्छ करणे प्रत्येकालाच जमत नाही. त्यामुळेच चांदीचे दागिने चकचकीत स्वच्छ कसे करावेत याची माहिती जाणून घेणार आहोत. यात सांगितलेल्या टिप्स ने तुम्ही देवीची चांदीची मूर्ती सुद्धा स्वच्छ करू शकता.

लिंबू पाणी

लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असते. त्यामुळे चांदीच्या दागिन्यांवर तसेच मूर्तीवर असलेला काळा थळ यारे दूर होतो. एक वाटी पाण्यामध्ये एक संपूर्ण लिंबू पिळून घ्या. त्यानंतर या पाण्यात सुती कापड भिजवून त्याने मूर्ती साफ करा. अशा पद्धतीने साफ केल्याने मूर्ती चमकू लागेल.

टूथपेस्टने साफ करा

टूथपेस्ट देखील चांदीच्या मूर्ती साफ करण्यासाठी उपयुक्त आहे. मूर्ती साफ करताना एका वाटीत टूथपेस्ट काढून घ्या. त्यानंतर यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करा. याची पातळ टेस्ट मूर्तीवर लावून ठेवा. टूथपेस्ट मूर्तीवर लावल्यानंतर ती पूर्ण सुकवून घ्या. त्यानंतर गरम पाण्याने मूर्ती स्वच्छ धुऊन घ्या.

बेकिंग सोडा आणि तुरटी

बेकिंग सोडा आणि तुरटी हे कॉम्बिनेशन देखील चांदीची मूर्ती चकचकीत करेल. मूर्ती स्वच्छ करण्यासाठी एका प्लेटमध्ये बेकिंग सोडा घ्या. दोन चमचे बेकिंग सोडा घेतल्यास एक चमचा तुरटी पावडर त्यात मिक्स करा. ही संपूर्ण पावडर तुम्हाला थेट मूर्तीवर लावायची नाही. मूर्तीला सर्वात आधी थोडे तेल लावून घ्या. त्यानंतर ही पावडर मूर्तीवर अप्लाय करा. पावडर लावताना ती चोळून घ्या. पावडर लावत असतानाच तुम्हाला लगेचच मूर्तीचा रंग बदललेला दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही मूर्तीसह घरातील विविध चांदीचे दागिने चमकवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? महायुतीने ठरवले 2 फॉर्म्युले, पाहा Video

Bhavin Bhanushali : अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलाचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

Maharashtra News Live Updates: पराभूत उमेदवारांच्या बैठकीनंतर आता मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू

Rohit Sharma: पर्थ टेस्टदरम्यान अचानक रोहित शर्माची एन्ट्री; चाहत्यांना दिलं मोठं सरप्राईज

Best Parenting Tips: तुम्ही मुलांना सतत ओरडता? मुलं तुमचेच ऐकतील, 'या' टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT