How To Keep Mushroom Fresh
How To Keep Mushroom Fresh Saam tv
लाईफस्टाईल

How To Keep Mushroom Fresh: पॅकेटमधून बाहेर काढल्याबरोबर मशरुम काळे पडते ? याप्रकारे करा स्टोअर महिनाभर राहिल फ्रेश

कोमल दामुद्रे

Kitchen Hacks : बाजारात गेल्यानंतर आपल्याला डोळ्यांना कुठे तरी पाहायला मिळतो तो मशरुम. मशरुम हा पदार्थ भारतात मध्यम प्रमाणात खाल्ला जातो. हल्ली डी-मार्टसारख्या ठिकाणी हा पदार्थ सहज पाहायला मिळतो.

एकावर एक फ्री असल्यामुळे आपण मशरुमचे पॅकेट विकत घेतो. पण बनवायचे कसे ? किंवा विकत घेतल्यानंतर ते अधिक काळ टिकवायचे कसे हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. बरेचदा आपण पालेभाज्या किंवा फळभाज्यांसारखे त्याला साफ करुन ठेवतो परंतु, तासाभरात ते खराब होते. असे का होते ? पांढरेशुभ्र दिसणारे मशरुम काळे का पडते हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का ? ते महिनाभर साठवायचे असेल तर कसे साठवाल ? जाणून घेऊया काही सोप्या टिप्स (Tips)

1. मशरूम शिजवण्यापूर्वी धुवून घ्या.

मशरूममध्ये 80 ते 90 टक्के पाणी (Water) असते. यावरील बारीक छिद्रासारखे पोत पाण्याला शोषून घेण्याचे काम करतात. त्यामुळे अति ओलसरपणामुळे मशरूम लवकर खराब होते. त्यासाठी जर तुम्हाला मशरुम अधिक काळ साठवून ठेवायचा असेल तर त्याला शिजवण्यापूर्वी धुवून घ्यावे. याप्रकारे मशरुम जास्त दिवस स्टोअर करु शकता.

2. उग्र वासापासून दूर ठेवावे

मशरुमला उग्र वासापासून दूर ठेवायला हवे. कारण मशरुम हा इतर पदार्थांचा वास शोषून घेतो. त्यामुळे त्याची चव निघून जाते.

3. अधिक काळ साठवण्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर करा

मशरूमला कागदी पिशव्यांमध्ये ठेवून तुम्ही अगदी आठवड्यांपर्यंत ते ताजे ठेवू शकता. कागद मशरूमला कोरडे ठेवण्याचे काम करते. ज्यामुळे ते लवकर खराब होत नाही. जर तुम्ही मशरूमला कापून घेतले असेल तर हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये 3 दिवसांसाठी साठवू शकता.

4. फ्रीजमध्ये कसे साठवाल ?

जर तुम्हाला मशरूमला एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी साठवायचे असल्यास त्याला फ्रीजमध्ये ठेवणे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यासाठी मशरूमला छोट्या-छोट्या तुकड्यात कापून घ्या. बटरमध्ये तळून थंड करून एका हवाबंद डब्यात घेऊन फ्रिजरमध्ये साठवू शकता. असे केल्याने मशरूमची चव आहे तशी राहाते.

5. खराब झालेला मशरूम कसा ओळखावा?

योग्य पध्दतीने साठवूनही मशरूमला अधिक काळासाठी ताजे ठेवले जाऊ शकत नाही. जर मशरूमचा रंग हा अधिक काळसर होत असेल व त्यावर रेषा आल्या असतील तर समजावा तो खराब झाला आहे. तसेच जर तो ओल्या स्पंज सारखा दिसत असेल आणि दुर्गंध सुटला असेल तर ते खराब होण्याच्या मार्गावर असल्याचे समजावे. अशावेळी फेकून देणे सोयीस्कर असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : नवी मुंबईत भाजपमध्ये अचानक राजीनामासत्र; निवडणूक धामधुमीत असं काय घडलं?

DJ ban in Buldana : महाराष्ट्रातला हा जिल्हा झाला 'डीजेमुक्त'; बुलडाण्यात थेट बंदी, कारणेही तशी गंभीर

Pakistan Squad: पाकिस्तानकडून १८ सदस्यीय संघाची घोषणा! टीम इंडियाला नडणाऱ्या गोलंदाजाचं कमबॅक

Hair Care Tips: कोरड्या केसांसाठी फायदेशीर आहे 'हा' होममेड हेअर मास्क

Ankita Lokhande: व्हायचं होतं हवाईसुंदरी, पण झाली अभिनेत्री

SCROLL FOR NEXT