Door mat Cleaning Tips : दाराजवळ असणारी पायपुसणी काळीकुट्ट झालीये ? अशी करा साफ, होईल एकदम चकाचक

How do you clean a door mat : डोअरमॅट साफ करताना या गोष्टी लक्षात ठेवा
Doormat Cleaning Tips
Doormat Cleaning TipsSaam Tv
Published On

Cleaning Hacks : आपल्या दाराजवळ घाण साचली असेल तर आपल्याला तिळसवाणे वाटू लागते. पण घरात असणारी पायपुसणी इतकी घाण असते की, त्यामुळे आपण आजारी पडतो हे देखील आपल्याला कळत नाही.

आपण घराबाहेरुन आल्यानंतर पाय स्वच्छ करण्यासाठी पायपुसणीचा वापर करतो. पण ही पायपुसणी तुम्ही किती स्वच्छ (Clean) ठेवता? किती दिवसांतून धुता ? यावर अवलंबून असते. तसेच तुमच्या घराची पायपुसणी स्वच्छ असेल तर तुमचे घर किती स्वच्छ आहे हे कळते त्यासाठी पायपुसणी कशी स्वच्छ करायला हवी यासाठी काही टिप्स (Tips) पाहूया

Doormat Cleaning Tips
White Clothes Cleaning Hacks : पांढऱ्या कपड्यांवरचे हट्टी डाग जात नाही ? मग या सोप्या टिप्स फॉलो करा, मिनिटात होतील नव्यासारखे

1. कशी कराल पायपुसणी साफ ?

  • बहुतेक डोअरमॅट्स कोरड्या व्हॅक्यूम क्लिनिंगसह स्वच्छ करणे सोपे आहे कारण यामुळे बहुतेक घाण आणि धूळ निघून जाते.

  • तसेच यावर असणारे हट्टी डाग आणि खुणा देखील निघून जातात.

  • बरेचदा व्हॅक्यूम क्लिनिंगने साफ करुनही ते बरोबर साफ होत नाही अशावेळी त्याला पाण्याने घासून स्वच्छ करायला हवे.

Doormat Cleaning Tips
Home Cleaning Hacks : दहा रुपयांत चमकवा तुमच्या घरातले घाणरेडे, पिवळे पडलेले बाथरुम, स्वच्छ करताना या गोष्टी लक्षात ठेवा

2. रबर बेस डोअरमॅट्स

  • गेल्या काही काळापासून रबर बेस डोअर मॅट्सचा ट्रेंड खूप वाढला आहे.

  • यापैकी काही मॅट्स वॉशिंग मशीनमध्ये धुतल्या जाऊ शकतात, परंतु तसे करण्यापूर्वी, मॅटच्या पॅकेटवरील साफसफाईच्या सूचना वाचायला हव्या.

  • हे आपण मॅट क्लिनर, सौम्य डिटर्जंट आणि पाण्याच्या मदतीने स्वच्छ करु शकतो.

  • तसेच त्याचा रंग टिकवून ठेवण्यासाठी आपण त्याला उन्हात न ठेवता पंख्याखाली सुकत ठेवायला हवे.

3. दोरीपासून बनविलेले डोअरमॅट

  • दोरीपासून बनवलेले डोअरमॅट हे नारळाच्या दोरीपासून बनवले जाते. हे अधिक टिकाऊ देखील असते.

  • तसेच हे अधिक पाणी देखील शोषून घेते यामुळे हे साफ करताना व्हॅक्यूम क्लिनरने बऱ्यापैकी साफ करता येते.

  • याशिवाय कॉर्नस्टार्च आणि बेकिंग सोडा मिसळून पावडर तयार करा आणि नंतर पाण्याच्या (Water) मदतीने स्वच्छ करा. आपण याला डिटर्जंट म्हणून वापरु शकतो.

Doormat Cleaning Tips
Cleaning Tips For Wooden Kitchenware : लाकडी भांड्याना वर्षभर टिकवायचे आहे ? तर हे घरगुती उपाय करुन पाहा

4. डोअरमॅट साफ करताना या गोष्टी लक्षात ठेवा

  • दर आठवड्याला व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने डोअरमॅट साफ करा, त्यामुळे घाण साचणार नाही.

  • डोअरमॅटवरील धूळ काढण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तो झटकणे

  • डोअरमॅट साफ करण्यासाठी महागडे डिटर्जंट वापरणे टाळा, त्याऐवजी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता.

  • दर दोन वर्षांनी तुमची पायपुसणी बदलली पाहिजे कारण एका वेळेनंतर ती खराब होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com