Kidney health expert advice saam tv
लाईफस्टाईल

Kidney Health: किडनी फेल करणाऱ्या 'या' सामान्य सवयी वेळीच ओळखा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Kidney Care : किडनीचे आरोग्य टिकवण्यासाठी दैनंदिन जीवनातील काही सवयी धोकादायक ठरू शकतात. तज्ज्ञांच्या मते, औषधांचा अतिरेक, जास्त मीठ किंवा पाणी या सवयी किडनीला गंभीर नुकसान पोहोचवतात.

Sakshi Sunil Jadhav

किडनी आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचे अवयव असतो. किडनीच्या हालचाली होताना शरीराला पटकन जाणवत नाहीत. शरीरातील घातक घटक बाहेर काढणे, द्रवपदार्थांचे संतुलन राखणे आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणे ही कामे किडनी करत असते. मात्र, दैनंदिन आयुष्यातील काही सवयींमुळे किडनीवर जास्त ताण येतो. पुढे त्याचा परिणाम दीर्घकालीन नुकसानाच्या स्वरूपात होऊ शकतो. अनेक वेळा किडनीच्या आजाराची लक्षणे सुरुवातीला दिसत नाहीत. तर ती शांतपणे वाढतात, त्यामुळे जीवनशैलीतील चुकीच्या सवयी टाळणे हीच सर्वोत्तम खबरदारी ठरते.

तज्ज्ञांच्या मते, वेदनाशामक औषधांचा (NSAIDs) अतिरेक किडनीसाठी धोकादायक ठरतो. डोकेदुखी, अंगदुखी किंवा मासिक पाळीच्या वेदनांसाठी वापरली जाणारी औषधे जरी आराम देतात तरी ती किडनीतील रक्तप्रवाह कमी करतात. विशेष म्हणजे ज्यांना आधीपासून किडनीचे आजार, हृदयविकार किंवा शरीरातील पाणी कमी होण्याची समस्या आहे. त्यांना या औषधांचा चुकीचा परिणाम अधिक होऊ शकतो. अशा औषधांचा वापर केल्यास किडनीमध्ये जळजळ होऊन ती कायमची फेल होण्याचा धोका वाढतो.

महत्वाचे सांगायचे झाले तर, जास्त मीठ खाण्याची सवय ही सुद्धा गंभीर समस्या निर्माण करू शकते. अनेकांना वाटतं की सागरी मीठ किंवा गुलाबी मीठ हे टेबल सॉल्टपेक्षा चांगलं असतं. मात्र प्रत्यक्षात सर्व मीठ हे सोडियम क्लोराईडच असते. त्यामध्ये असणाऱ्या मिनरलमध्ये फारसा फरक नसतो. शरीरात जास्त सोडियम गेल्यास रक्तदाब वाढतो आणि त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे कोणतेही मीठ वापरले तरी प्रमाण कमी ठेवणे अत्यावश्यक आहे.

तसेच, पाणी जास्त प्रमाणात पिणे हे आरोग्यासाठी चांगलेच असेल असा गैरसमज अनेकांना होतो. मुळात ६ ते ७ लिटर पाणी दररोज पिणे किडनीसाठी धोकादायक ठरू शकते. जास्त पाणी पिल्यास रक्तातील सोडियमचे प्रमाण घटते आणि हायपोनॅट्रेमिया ही स्थिती निर्माण होऊ शकते. यात किडनीला पाणी बाहेर टाकण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते. गंभीर स्थितीत मेंदूत सूज, झटके किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, निरोगी प्रौढ व्यक्तींनी साधारण दोन ते तीन लिटर पाणी दररोज प्यावे. मात्र तहान लागल्यावरच पाणी पिणे हा सर्वोत्तम नियम मानला जातो.

कोणतीही वेदनादायक औषधे घेण्यापूर्वी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. किडनी किंवा लिव्हरचे आजार, हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. औषधांचे डोस काटेकोरपणे पाळावेत व कालावधीपेक्षा जास्त काळ औषधे घेणे टाळावे. आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक औषधेदेखील कधी कधी जड धातूंसारखे हानिकारक घटक असतात. ज्यामुळे किडनी वा यकृताला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे कोणतेही औषध वापरण्यापूर्वी त्यातील सक्रिय घटक तपासणे अत्यंत महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: लग्नात परीसारखा सुंदर लूक हवाय? मग 'या' सोप्या टिप्स फॉलो करा, सर्वांच्या नजरा तुमच्यावरच खिळतील

Electric Cars: लय भारी! इलेक्ट्रिक टू-व्हीलरसह कार, टॅक्सी, ट्रकसाठी सब्सिडी

Ajit Pawar Beed Tour: अजित पवारांच्या दौऱ्यातील हृदयस्पर्शी दृश्य; चिमुकला कडेवर आणि महिला पोलीस बंदोबस्तावर

Maharashtra Live News Update: PM नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्त पुण्यात खास ड्रोन शो

Daily Horoscope: गोड बातमी मिळणार की ब्रेकअप होणार; प्रेमी जोडप्यांसाठी कसा असेल बुधवारचा दिवस?

SCROLL FOR NEXT