कॅन्सर हा आजार सगळ्यात मोठा आणि जीवघेणा आहे. या आजारात फक्त पुरुषांचा नाही तर स्त्रींयाचा सुद्धा समावेश आहे. दरवर्षी कर्करोगामुळे अनेक लोक मृत्यू पावतात. पहिल्यांदा जेव्हा या रोगाचा जगाशी सामना झाला तेव्हा एक समज निर्माण झाला की जे धुम्रपान करतात त्यांनाच कर्करोग होतो किंवा तंबाखू खाल्ल्यानेच कर्करोह होतो. पण हळूहळू पोटाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग किंवा अन्य कर्करोग हे जगासमोर उलगडू लागले आहे.
या वाढत्या कर्करोगापासून बचाव कसा हे आपण जाणून घेतले पाहिजे. आपल्या स्वयंपाकघरात काही अशा गोष्टी असतात ज्याच्या वापराने कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीच किचनमधल्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. आजच्या धावपळीच्या जगात लोक सगळ्यात सोप्या आणि सोईस्कर पद्धतींचा वापर करतात. मात्र त्याच स्वयंपाक घरातल्या गोष्टींमुळे कॅन्सरसारखा मोठा गंभीर आजार होण्याचा धोका वाढत असतो. चला तर जाणून घेऊ कोणत्या वस्तुंमुळे कॅन्सरचा धोका वाढतो.
नॉनस्टिकची भांडी
पीएफओए नावाच्या कार्सिनोजेनिक रसायनापासून नॉन-स्टिक भांडी बनवली जातात. त्यामुळे तुम्ही जितक्यावेळ्या ती भांडी गरम करता तितक्यावेळेस ती भांडी विषारी वास सोडतात ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. सुरुवातीला फ्लू सारखी लक्षणे दिसतात मग पुढे प्रकरणांमध्ये, कर्करोगाची चिंता वाढवते.
प्लास्टिकची भांडी
रोज प्लास्टिकची भांडी वापरल्याने रोगप्रतिकारकशक्ती आणि हार्मोन्स प्रभावित होत असतात. लठ्ठपणा वाढतो, इंन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकते.
अॅल्युमिनियमची भांडी
अॅल्युमिनियमची भांडी प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतात. पण ती भांडी आपला घात करू शकतात. अॅल्युमिनियमची भांडी वापरल्याने त्यातील अॅल्युमिनियम संपतो आणि अन्नाद्वारे आपल्या शरीरात पोहोचतो, त्यामुळे आपल्या शरीरात विष पसरते. त्यानेच कर्करोगाचा धोका वाढतो.
अॅल्युमिनियम फॉइल
जेवण जास्त काळ टिकवण्यासाठी घरात सुद्धा लोक अॅल्युमिनियम फॉइलचा वापर करतात. पण त्यातील अॅल्युमिनियम हळूहळू अन्नाद्वारे आपल्या शरीरात जात असते. ते पोटात गेल्यामुळे आपल्या शरीराला झिंक नीट शोषूण घेता येत नाही. त्यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.