Skin Glowing  Saam Tv
लाईफस्टाईल

Skin Glowing : स्किन ग्लोइंग करण्यासाठी अशा प्रकारे गुळवेलचा वापरा करुन चेहरा नॅचरल पद्धतीने उजळवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Giloy For Face : डागरहित आणि चमकदार त्वचा असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु प्रदूषण आणि इतर कारणांमुळे त्वचा निर्जीव आणि निस्तेज दिसू लागते. अशा परिस्थितीत लोक पार्लरमध्ये जाऊन महागडे उपचार करून घेतात, ज्याचा विशेष परिणाम दिसून येत नाही. येथे आम्ही तुम्हाला सौंदर्य वाढवण्यासाठी गुळवेलचा वापर सांगणार आहोत. गुळवेलचे सेवन केल्यानेच नाही, तर ते लावल्याने त्वचा सुधारते आणि डाग दूर होतात.

चेहऱ्यावर गुळवेल कसे वापरावे

गुळवेल दूध

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी गुळवेलचा दुधासोबत वापर करा. यासाठी तुम्हाला 1 चमचे गिलॉय पावडर लागेल. या पावडरमध्ये कच्चे दूध मिसळून पेस्ट तयार करा आणि नंतर फेस पॅकप्रमाणे चेहरा आणि मानेवर लावा. 20 ते 30 मिनिटांनंतर हा फेसपॅक ताज्या पाण्याने स्वच्छ करा. काही दिवसांच्या वापरानंतरच तुम्हाला चमक दिसू लागेल.

गुळवेल - मध

चेहरा तरुण बनवण्यासाठी गुळवेलमध्ये मध मिसळून वापरा. यासाठी तुम्हाला गुळवेलची ताजी फळे लागतील. या फळांची पेस्ट बनवा आणि त्यात मध घाला. गुळवेल आणि मधाची ही पेस्ट चेहऱ्यावर 20 मिनिटे लावल्यानंतर पाण्याने धुवा. याच्या वापराने चेहऱ्यावर घट्टपणा येतो.

गुळवेल - गुलाब पाणी

गुळवेल पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून लावल्याने चेहरा उजळतो. यासाठी 1 चमचा गुळवेल पावडर घ्या आणि आवश्यकतेनुसार त्यात गुलाबजल मिसळा. हा फेस पॅक चेहरा आणि मानेवर लावा आणि कोरडे झाल्यावर धुवा. आठवड्यातून किमान 2 वेळा हा पॅक वापरा.

गुळवेल लाकूड

गुळवेलचे मऊ लाकूड बारीक करून त्वचेवर लावल्याने रॅशेस आणि अॅलर्जीची समस्या दूर होते. यासोबतच ही पेस्ट लावल्याने मुरुमांची समस्याही कमी होते. गुळवेल लाकडाची पेस्ट चेहऱ्यावर कोरडे होईपर्यंत लावा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

गुळवेल - कोरफड

गुळवेलमध्ये कोरफड मिसळून लावल्याने त्वचा हायड्रेट राहते. यासाठी 1 चमचे गुळवेल स्टेम पेस्टमध्ये एलोवेरा जेल मिक्स करा. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT