Eye Makeup SAAM TV
लाईफस्टाईल

Eye Makeup : आयलाइनर लावताना हात थरथरतो? 'या' गोष्टी कटाक्षाने पाळा अन् डोळ्यांचे सौंदर्य वाढवा

Apply Perfect Eyeliner : आयलाइनर लावणे बहुतेक मुलींना आवडते. कारण यामुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढते. मात्र आयलाइनर लावताना काहींचे हात थरथरायला लागतात. अशावेळी आयलाइनर लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या आयलाइनर ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये चांगलेच ट्रेडिंगवर आहे. आजकाल अनेक मुली नियमित डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आयलाइनर लावतात. पण अनेक मुलींना आयलाइनर लावताना त्रास होतो. त्यांचे हात थरथरायला लागतात. अशावेळी रेखीव आयलाइनर कसे लावावे जाणून घ्या.

आयलाइनर लावताना 'ही' घ्या काळजी

  • पहिल्यांदाच स्वतःच्या हाताने डोळ्यांना आयलाइनर लावणार असाल तर सुरुवातीला पेन्सिल आयलाइनरचा वापर करा. कारण लिक्विड आयलाइनर पेक्षा पेन्सिल लावणे सोपे जाते.

  • लिक्विड आयलाइनर लावताना एका हातात आयलाइनर ब्रश तर दुसऱ्या हातात डोळ्याचे शेवटचं टोक धरावे. असे केल्यास प्लेन सरफेस तयार होऊन तुम्हाला आयलाइनर लावणे सोपे जाईल.

  • लिक्विड आयलाइनर लावताना कधीही जास्त आयलाइनर ब्रशमध्ये घेऊ नये. कारण ते पसरू शकते.

  • आयलाइनर लावताना एक डोळा बंद होत असल्यामुळे त्यांची जास्त थरथर होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या.

  • आयलाइनर लावताना डोळा कधीही हलका मिटणे गरजेचे आहे. तरच आयलाइनर सफाईदारपणे लागते.

  • आयलाइनर लावल्यानंतर १ मिनिटांनी डोळा उघडा. कारण आयलाइनर सुकायला वेळ लागतो.

  • आयलाइनर ब्रश नेहमी डोळ्यांच्या समान रेषेत पकडा.

जेल आयलाइनर

साहित्य

जेल आयलाइनर बनवण्यासाठी आय प्राइमर, खोबरेल तेल, नैसर्गिक रंग यांचा वापर करावा.

कृती

जेल आयलाइनर घरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात ५ ते ६ थेंब आय प्राइमर आणि थोडे खोबरेल तेल मिक्स करा. यानंतर तुमच्या आवडीचा नैसर्गिक रंग त्यात मिक्स करा. अशाप्रकारे जेल आयलाइनर घरी तयार झाले. हे डोळ्यांना लावण्याआधी पॅचटेस्ट नक्की करा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT