Manasvi Choudhary
चेहऱ्यावर बर्फ लावून मसाज करणे हे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. उन्हाळ्यात त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे.
चेहऱ्याला बर्फ लावल्याने पिंपल्सची जळजळ, लालसरपणा आणि सूज कमी होते त्वचेला थंड वाटते.
बर्फामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचा लगेच सतेज आणि गुलाबी दिसायला लागते.
सकाळी उठल्यावर डोळ्यांखाली किंवा चेहऱ्यावर आलेली सूज घालवण्यासाठी बर्फाचा मसाज अत्यंत फायदेशीर आहे.
बर्फ कधी थेट चेहऱ्यावर लावू नका सुती कापडामध्ये गुंडाळून बर्फ चेहऱ्यावर लावा.
मेकअप करण्यापूर्वी बर्फ लावल्यास घाम कमी येतो आणि मेकअप जास्त काळ टिकण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.