Morning Health : ब्रश करण्यापूर्वी पाणी पिताय? या गोष्टी लक्षात ठेवा, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Is It Alright To Drink Water Without Brushing Your Teeth : ब्रश करण्यापूर्वी किती ग्लास पाणी प्यावे? याचा आरोग्याला आणखी कसा फायदा होतो? जाणून घेऊया सविस्तर
Morning Health,Is It Alright To Drink Water Without Brushing Your Teeth
Morning Health,Is It Alright To Drink Water Without Brushing Your TeethSaam tv
Published On

How Much Drink Water Morning Time :

सकाळी उठल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण आंघोळीला जातात. काहीजण ब्रश नाश्ता करुन आंघोळीला जातात. पण सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय करता हे अतिशय महत्त्वाचे आहे.

सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी (Water) प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. यामुळे शरीरातील विषारी पदार्थांचे प्रमाण कमी करता येते. तसेच यामुळे यकृत, आतडे आणि पोट साफ होण्यास मदत होते. याशिवाय पोटासंबंधित अनेक आजारही कमी होतात. ब्रश करण्यापूर्वी किती ग्लास पाणी प्यावे? याचा आरोग्याला (Health) आणखी कसा फायदा होतो? जाणून घेऊया सविस्तर

1. सकाळी ब्रश करण्यापूर्वी किती पाणी प्यावे?

सकाळी उठल्यानंतर २ ग्लासापेक्षा जास्त पाणी पिऊ नये. या काळात शरीर झोपलेल्या अवस्थेत असते. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. नियमितपणे सकाळी पाणी प्यायल्याने पित्त नियंत्रणात राहाण्यास मदत होते. पचनक्रिया सुरळीत राहाते. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.

Morning Health,Is It Alright To Drink Water Without Brushing Your Teeth
Skin Care Tips : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, पिंपल्स आणि रिंकल्सच्या समस्येपासून मिळेल कायमची सुटका

2. फायदे कसे होतात?

ब्रश न करता पाणी प्यायल्याने अॅसिडिटी, आंबट ढेकर येणे, पोटदुखी अशा अनेक समस्या आपोआप कमी होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. नियमितपणे सकाळी पाणी प्यायल्याने चेहऱ्याचे (Skin) सौंदर्य सुधारते. डार्क सर्कल, मुरुमे, निस्तेज त्वचेपासून सुटका होते. झोपताना तोंडात बॅक्टेरिया जमा होतात. पाणी प्यायल्याने हे बॅक्टेरिया देखील गिळले जातात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. हे पचन सुधारण्यास मदत करते. तसेच अपचण रोखण्यास आणि बीपी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com