Eyeliner Tips : बहुतांश स्त्रीया व मुलांना सुंदर दिसायला आवडते. एखाद्या पार्टीत किंवा फंक्शनच्या वेळी आपण मेकअप करतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरही ग्लो येतो.
हे देखील पहा -
सोशल मीडियावर आपण मेकअप करण्याचा अनेक पध्दती पहात असतो. परंतु, प्रत्येकाने सांगितलेल्या टिप्सनुसार योग्य मेकअप कसा करावा हे आपल्याला कळत नाही. सध्या सोशल मीडियावर आपल्या आवडत्या कलाकारांनी डोळ्यांना आयलाईनर लावल्यानंतर त्यांचे डोळे आकर्षक दिसू लागतात. परंतु, आजकाल कोणत्या प्रकारचे आयलायनर ट्रेंडमध्ये आहे हे शोधणे आपल्यासाठी थोडे कठीण काम आहे. म्हणूनच आपल्या आवडत्या बॉलीवूड अभिनेत्रींची पसंती कोणत्या आयलाइनरला आहे हे जाणून घेऊया. ज्यामुळे आपण सुंदरही दिसू व ट्रेंडही जपता येईल. सोप्या पध्दतीने आयलाइनर कसे लावायचे हे आपल्यापैकी बऱ्याच स्त्रीयांना माहीत असते. पण आयलाइनर लावयाची स्टाईल बदलायची असेल तर या टिप्स फॉलो करा.
१. आयलाइनर लावायची सवय बदलायची असेल तर आपण डबल विंग्ड आयलायनर लावू शकतो. या लुकमध्ये आयलायनरचा कोट खूप रुंद पद्धतीने लावायला हवे. तसेच दुहेरी विंगसाठी अतिशय पातळ आयलायनरचा कोट वापरल्यास डोळे सुंदर दिसू लागतात.
२. त्यानंतर सोशल मीडियावर आपल्याला आयलायनरचे अनेक प्रकार पाहायला मिळतील. एंजर विंग आयलाइनर त्यापैकी एक आहे. एंजेल विंग आयलायनर आपल्या डोळ्यांच्या मेकअपला सर्वात अनोखा आणि बोल्ड लुक देतो. या लुकसाठी आय शॅडो ब्राऊन किंवा न्यूड ठेवण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने आपल्या डोळे (Eye) अधिक उठून दिसतील.
३. बोल्ड विंग्ड आयलायनर खूप क्लासी दिसते. कोणत्याही लग्नासाठी (Wedding) किंवा पार्टीसाठी आपण या प्रकारचे आयलायनर वापरून पाहू शकतो. तसेच, आपल्या ओठांना लिपस्टिक लावू नका. असे केल्याने आपल्या डोळ्याच्या मेकअपचा लूक अतिशय सुंदरपणे हायलाइट होईल.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या ब्युटीशियनशी संपर्क साधावा.
Edited By - Komal Damudre
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.