Diabetes Diet Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Diet: साखरेवर नियंत्रण ठेवायचंय? तर डायबिटीजच्या रुग्णांसाठी अमृत असणारं हे हिरवे पान खा

Radish Leaves Benefits: हिवाळ्यात मुळ्याची पानं खाल्ल्याने डायबिटीज नियंत्रणात राहतो, पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या पानांमधील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स शरीरासाठी अमृतासमान आहेत.

Sakshi Sunil Jadhav

मुळ्याची पानं डायबिटीज रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरतात.

या पानांमधील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स पचन व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

लिव्हर आणि त्वचेसाठी मुळ्याची पानं अत्यंत फायदेशीर आहेत.

हिवाळ्याच्या दिवसांत हिरव्या भाज्यांचे सेवन शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्यामध्ये मुळ्याची पानं ही अशी भाजी आहे जी आरोग्यासाठी अमृतासमान मानली जाते. मुळ्याच्या पानांमध्ये फायबर, व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह आणि अँटिऑक्सिडंट्स योग्य प्रमाणात असतात. याने शरीराचा अनेक आजारांपासून बचाव होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात आहारात मुळ्याची पानं नक्की घ्यावीत. कारण ती पचनसंस्थेला बळ देतात आणि शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर काढण्याचे काम करतात. या पानांचा उपयोग भाजी, पराठे, सूप किंवा चटणी या विविध प्रकारे केला जाऊ शकतो. मुळ्याच्या पानांची भाजी फक्त स्वादिष्टच नाही तर पौष्टिक घटकांनीही समृद्ध असते. जेव्हा ही भाजी किसलेल्या मुळीसोबत केली जाते. तेव्हा तिची चव जास्त वाढते आणि ती शरीराला उष्णता तसेच ताजेतवानेपणा देते.

तज्ज्ञांच्या मते, मुळ्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. किसलेला मुळाही थोडी निचळून घ्या. कढईत तेल तापवून त्यात जिरं, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा परतावा. नंतर त्यात मसाले आणि चिरलेली पानं-मुळा टाकून ७ ते १० मिनिटं मंद आचेवर शिजवा. जेव्हा पानं आकसतात भाजी कोरडी होते, तेव्हा ती खाण्यासाठी तयार होते.

आयुर्वेदात मुळ्याच्या पानांना अनेक आजारांवर औषध मानले जाते. यात भरपूर फायबर असल्यामुळे ती पचनसंस्थेसाठी अत्यंत उपयोगाची ठरतात. मुळ्याची पानं कफ, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांवर प्रभावी आहेत. ती भूक वाढवतात आणि शरीर हलकं ठेवतात. नियमित सेवनामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि लिव्हर निरोगी राहतो.

डायबिटीजच्या रुग्णांसाठी मुळ्याची पानं औषधापेक्षा कमी नाहीत. त्यातील घटक ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित ठेवतो आणि इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत सुधारणा करतो. त्यामुळे ग्लुकोजचे प्रमाण संतुलित राहते. म्हणूनच डायबिटीज असलेल्या लोकांनी हिवाळ्यात आपल्या आहारात मुळ्याची पानं नक्की घावीत. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C त्वचेसाठीही फायदेशीर आहेत. हे त्वचेची चमक वाढवतात आणि मुरुमांसारख्या समस्यांवर आराम देतात. मुळ्याची पानं मूत्रवर्धक असल्याने मूत्रविकार आणि मूत्रपिंडाशी संबंधित त्रासातही मदत करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT