

सफरचंद, बेरीज, ड्रॅगन फ्रूट, सिट्रस फळं कॅन्सरचा धोका टाळतात.
या फळांतील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स पेशींचं संरक्षण करतात.
दररोज फळं खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
रोजच्या दैनंदिन आयुष्यात आपण आहारासोबत फळांचाही समावेश केला पाहिजे असे तज्ज्ञ आपल्याला नेहमीच सांगत असतात. कोणताही आजार दूर करण्यासाठी फळांचा आहार महत्वाचा असतो. कारण त्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेत त्यातील गुणधर्म हे कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि पचनाच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. पुढे आपण कोणत्या फळांचे सेवन केल्याने कॅन्सरचा धोका कमी करु शकतो किंवा टाळू शकतो हे जाणून घेणार आहोत.
सफरचंद
An apple a day keeps the doctor away हे म्हणणे अगदी खरं आहे. संशोधनात असं आढळलंय की सफरचंद नियमित खाल्ल्याने फुफ्फुसाचा आणि स्तनाच्या कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. सफरचंदांमध्ये पॉलीफेनॉल्स आणि क्वेर्सेटिन हे घटक असतात. जे शरीरातील सूज कमी करतात आणि कॅन्सरच्या पेशींची वाढ थांबवतात.
बेरीज
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी यांसारख्या बेरीजमध्ये फायबर, व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. या फळांमुळे शरीरातील इम्युनिटी वाढते आणि कॅन्सर पेशी सुरुवातीलाच नष्ट होऊ शकतात. गोची बेरीचा पारंपरिक औषधोपचारात वापर केला जातो, आणि संशोधनानुसार ती कॅन्सर ट्यूमर कमी करण्यास मदत करते.
ड्रॅगन फ्रूट
आकर्षक गुलाबी रंगाचं हे फळ लायकोपीन या घटकाने समृद्ध आहे. लायकोपीनमुळे प्रोस्टेट, स्तन, लिव्हर आणि त्वचेच्या कॅन्सरपासून बचाव होतो. ड्रॅगन फ्रूटमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक घटकांना नष्ट करतात आणि पेशींचं संरक्षण करतात.
सिट्रस फळं
संत्रं, मोसंबी, ग्रेपफ्रूट यांसारख्या सिट्रस फळांमध्ये व्हिटॅमिन C आणि फ्लॅवोनॉइड्स असतात. हे घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि कॅन्सर पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात. जपानमध्ये झालेल्या अभ्यासानुसार, आठवड्यात ३-४ वेळा सिट्रस फळं खाणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सरचा धोका कमी आढळला.
दररोज आहारात ही फळं समाविष्ट केल्यास केवळ शरीराला पोषण मिळत नाही तर दीर्घकाळ आरोग्य टिकवण्यासाठी मदत होते. नियमित फळं खाल्ल्याने शरीरातील नैसर्गिक संरक्षणशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.