Breastfeeding Tips  saam tv
लाईफस्टाईल

Breastfeeding Tips : ऑफिसला जाणाऱ्या नव मातांनी बाळांना दूध पाजण्याचे नियोजन कसे करावे? वेळ नसेल तर उपाय काय?

Breastfeeding Tips For Working Mothers : आज जाणून घेऊयात प्रसूतीच्या काळात नवीन मातांनी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे.

कोमल दामुद्रे

Breastfeeding as a Working Mother : बदलेल्या जीवनशैलीनुसार महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करतात. आज महिलांना घरी राहण्यापेक्षा बाहेर जाऊन काम केलेले बरे वाटते. परंतु, आई झाल्यानंतर घर व ऑफिस सांभाळणे कठीण होते.

नवीन मातांना एकतर आपल्या बाळाची काळजी घ्यावी लागते किंवा ऑफिस. दोन्ही एकाचवेळी सांभाळणे कठीण असते, त्यात सुरुवातीच्या काळात बाळाला स्तनपान करणे अत्यंत गरजेचे असल्याने सहसा ऑफिसला मुकावे लागते. आज जाणून घेऊयात प्रसूतीच्या काळात नवीन मातांनी कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे.

पुण्यातील पिंपरीच्या बालरोग विभागाच्या प्रमुख, डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. शैलजा माने म्हणतात की, गरोदर असताना आईचे वजन ८ ते १२ किलोने वाढणे हे नैसर्गिक आहे. परंतु, आजकाल ज्या नवीन माता (Mother) आहेत त्या वजन वाढण्याबद्दल खूप काळजी करतात. त्यामुळे त्यांना असं वाटत की हे वजन लवकर कमी झालं पाहिजे. वजन कमी करण्यामध्ये स्वतःवर किंवा बाळाच्या पोषणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी स्वतःची व बाळाची काळजी (Baby care) घेणं अत्यंत आवश्यक आहे.

त्यामुळे त्यांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अनेक गैरसमजुती आपल्या समाजामध्ये आढळतात. विशिष्ट पदार्थांचं सेवन करू नये किंवा दात चांगले असताना सुद्धा पदार्थ द्रव स्वरूपातच सेवन करावे. तर या गैरसमजुती आहेत.

आईने योग्य प्रमाणात पाणी (Water) प्यायला हवं. आईला किमान २४ तासामध्ये ७-८वेळा पाण्यासारखी स्वच्छ लघवीला व्हायला हवी. पिवळी लघवी होत असेल तर पाण्याचे प्रमाण कमी आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण आईच्या दुधामध्ये जास्त प्रमाणात पाणी असते. तेवढे अधिक पाणी पिणे व पौष्टिक व समतोल आहार घेणे आवश्यक असते.

घराबाहेरील जंकफूड, शीतपेय टाळायला हवे. कारण दूध हे बॉडी सिक्रेशन आहे म्हणजेच आईच्या शरीरातून बाहेर येणारे स्त्राव आहे. त्यामुळे आई जे खाणार त्यानुसार त्या स्रावाची निर्मिती होते. त्यानुसार त्यामध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॅट, पोषक तत्वांचे प्रमाण असते. त्यामुळे आईने पौष्टिक घरगुती, सकस अन्नाचे सेवन करणे फायद्याचे ठरते.

भारतामध्ये प्रत्येकाच्या परंपरा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे जे काही पारंपरिक पौष्टिक पदार्थाचे सेवन केले पाहिजे. २ वेळा व्यवस्थित जेवण आणि २ वेळा नाश्ता केला पाहिजे. आणि मधल्या वेळेत फळे, सुका मेवा खायला हवा. दुध वाढण्यासाठी सुद्धा काही नैसर्गिक गोष्टी आहेत त्यामध्ये अळीव, मेथी किंवा बाजरी सारखे पारंपरिक पदार्थ आहेत ज्यामुळे दूध वाढायला मदत होते. आणि स्वतःचे पोषण वाढते आणि बाळाला पोषक मूल्ये दुधातून मिळतात. जर तीने आहार व्यवस्थित घेतला नाही तर तिच्या शरीरातील आयर्न, जीवनसत्त्वे, मिनरल्स हे सगळे व्यवस्थित न मिळाल्याने हाडे ठिसूळ होऊन कंबर दुखणे, पाठ दुखी किंवा गुडघे दुखणे यांसारख्या व्याधी सुरु होतात. त्यामुळे पोषक आणि समतोल आहार घेणे गरजेचे आहे.

काम करणाऱ्या महिलांना नेहमीच सहकार्य करणे गरजेचं आहे कारण त्यांना बाळाकडे ही बघायचा असते, त्याला दूध पाजायचे असते, त्याचसोबत कुटुंबाकडे आणि ऑफिसही ही बघायचे असते. आणि हे सगळं करण्यामध्ये त्यांची प्रचंड ओढाताण होते. त्यामुळे बऱ्याचदा स्वतःकडेही दुर्लक्ष होते. त्यामुळे कुटुंबातील इतरांनी काम करणाऱ्या महिलेला मदत करणे अत्यंत गरजेचे आहे. जस की, घरच्यांनी गरोदर असताना या स्तनपान करण्याचे महत्व सांगून दिले पाहिजे. पहिल्या ६ महिन्यात फक्त आईचेच दूध देणे खूप फायदेशीर ठरते. पुढे किमान २ वर्ष ते कायम ठेवायला हवे.

प्रसूती झाल्यानंतर वैद्यकीय सेवकांनी मातेला कशाप्रकारे शरीराची स्थिती असायला हवी, बाळाला कसे पकडायला हवं, स्तनाग्रे बाळाच्या तोंडामध्ये कशाप्रकारे दिली पाहिजेत त्याची योग्य पद्धत समजावून सांगायला हवी. ज्यावेळी ६ महिन्यानंतर ती कामाला पुन्हा रुजू होते तेव्हा, दर २ ते ३ तासांनी स्तन रिकामे करणं फार गरजेचे असते.

त्यामुळे तिथे दूध पाजण्यासाठी आणि काढण्यासाठी जागा असणे गरजेचे आहे. जर २-३ तासांनी दूध काढले नाही तर एफआयएलच्या (feedback inhibitor of lactation) मुळे स्तन घट्ट होऊन अवरोधिक संकेत जातात त्यामुळे दुधाचे सिक्रेशन कमी होतात. ते करण्यासाठी पाणी, साबण, सॅनिटायझर, नॅपकिन अशी स्वच्छतेची सोय असावी. दूध काढून ठेवण्यासाठी कंटेनर असले पाहिजेत. शिवाय ते साठवून ठेवण्यासाठी रेफ्रिजरेटर अशा सुविधा असल्या पाहिजेत. त्यासाठी हिरकणी कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे.

कारण, बाळ आजारी पडले तर पुन्हा तिला रजा घ्याव्या लागतात त्यामुळे कामावरही आणि ही बाळावर परिणाम होऊ शकतो. यामध्ये तिच्या सहकारी कर्मचारी, वरिष्ठ आणि कुटुंबातील सर्वानी मदत करणे गरजेचे आहे. ज्यामुळे सुदृढ राहील आणि पुढे चांगले आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य जगू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

Gujarat : सुट्टीत मित्रांसोबत तुफान मजा करा, गुजरातच्या 'या' खास लोकेशन भेट द्या

SCROLL FOR NEXT