Fat intake for dinner saam tv
लाईफस्टाईल

Fat intake for dinner: रात्रीच्या जेवणातून किती प्रमाणात फॅट्स घेणं शरीरासाठी योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांची माहिती

Benefits of eating fat at night: रात्रीच्या जेवणात काय खावे आणि काय टाळावे, याबद्दल अनेक गैरसमज आहेत. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणातून फॅट्स (Fats) पूर्णपणे काढून टाकतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • फीटनेससाठी संतुलित चरबीचे प्रमाण आहारात असणे गरजेचे आहे.

  • चरबी ऊर्जा, हार्मोन्स आणि मेंदूच्या विकासासाठी आवश्यक आहे.

  • डिनरमध्ये १०-१५ ग्रॅम चरबी पुरेशी मानली जाते.

फीट राहावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. फीटनेससाठी प्रोटीन, कर्बोदके, जीवनसत्त्वं आणि चरबी यांचं संतुलित प्रमाण आहारात असणं महत्त्वाचं आहे. वजन कमी करत असतानाही याला अपवाद नाही. मात्र, ही चरबी फास्टफूड किंवा प्रोसेस्ड अन्नातून मिळणारी नसावी. मेंदू, स्नायू आणि एकूणच शरीराच्या कार्यक्षमतेसाठी योग्य प्रमाणात आणि दर्जाची चरबी घेणं गरजेचं असतं.

चरबीचं काम काय असतं?

श्री बालाजी मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलमधील नोंदणीकृत डायटिशियन दीपलक्ष्मी यांनी सांगितलंय की, चरबी हा एक महत्त्वाचा 'मॅक्रोन्युट्रिएंट' आहे जो शरीराला ऊर्जा पुरवतो. याशिवाय मेंदूचा विकास, हार्मोन्सचं उत्पादन, पेशींचं कार्य आणि अंतर्गत अवयवांचं संरक्षण यासाठीही चरबी महत्त्वाची आहे.

डिनरमध्ये किती फॅट्स घेणं योग्य?

डायटिशियन दीपलक्ष्मी यांच्या सांगण्यानुसार, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या शिफारशीनुसार एकूण उर्जेच्या गरजेपैकी ३० टक्क्यांपेक्षा कमी ऊर्जा चरबी म्हणजेच फॅटमधून मिळणं योग्य ठरतं. जर एखादी व्यक्ती दिवसाला 1500 किलो कॅलरी घेत असेल तर त्यातील सुमारे २५ टक्के म्हणजेच सुमारे ४१ ग्रॅम फॅट्स आवश्यक असतं. यापैकी डिनर म्हणजे तुमच्या रात्रीच्या जेवणाममध्ये १०-१५ ग्रॅम फॅट्स पुरेशी असते.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, डिनरमध्ये चरबीचं प्रमाण २०-३० टक्क्यांच्या दरम्यान असलं पाहिजे. जर डिनर ५०० कॅलरीचं असेल तर त्यामध्ये १०-१५ ग्रॅम चरबी योग्य ठरतं. हे प्रमाण पचनाला त्रास न देता पोटभरपणाची भावना देतं.

डिनरमध्ये जास्त फॅट्स घेतल्यास काय होते?

डिनरमध्ये जास्त फॅट्स घेतल्यास वजनात वाढ, लठ्ठपणा, अपचन आणि गॅसेसचा त्रास होऊ शकतो. विशेषतः जास्त कॅलरी असलेल्या पदार्थांतून हे फॅट्स मिळत असेल तर हा धोका वाढतो. प्रोसेस्ड किंवा ट्रान्सफॅटयुक्त अन्न घेतल्यास कोलेस्टेरॉल वाढून हृदयरोगांचा धोका निर्माण होतो. WHO च्या मते, संपूर्ण उर्जेच्या १०% पेक्षा कमी चरबी सॅच्युरेटेड फॅट्समधून मिळावी आणि ट्रान्स फॅट्सचं प्रमाण १% पेक्षा कमी असावं.

डिनरमध्ये कोणते फॅट्स घ्यावेत?

डिनरसाठी ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्समधून मिळणारी 'हेल्दी फॅट' सर्वोत्तम असतात. उदाहरणार्थ, सॅल्मन मासा, चिया बिया, फ्लॅक्ससीड्स (अळशी), फिश ऑइल सप्लिमेंट्स यातून मिळणारी चरबी हृदयासाठी फायदेशीर असते. मात्र डायटिशियन फास्ट फूड, तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड मांस आणि बेकरीच्या वस्तू टाळण्याचा सल्ला देतात. कारण त्यामध्ये सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स जास्त प्रमाणात असतात.

FSSAIने आरयूसीओ (RUCO - Reused Cooking Oil) वापरण्याविरुद्ध इशारा दिला आहे. एका तेलात पुन्हा पुन्हा तळणी केल्याने त्याच्या गुणधर्मात बदल होतो आणि 'टोटल पोलर कंपाऊंड्स' तयार होतात. या विषारी घटकांमुळे उच्च रक्तदाब, अ‍ॅल्झायमर, अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस, यकृताचे आजार असे गंभीर परिणाम होऊ शकतात.

त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यासाठी FSSAI ने टोटल पोलर कंपाऊंड्सचं प्रमाण २५% पेक्षा जास्त नसावं, असा नियम केला आहे. त्यानंतर ते तेल वापरणं धोकादायक ठरतं.

चरबीचे शरीरासाठी काय फायदे आहेत?

चरबी शरीराला ऊर्जा देते, मेंदूच्या विकासास मदत करते, हार्मोन्सचे उत्पादन आणि पेशींचे कार्य सुरळीत ठेवते.

डिनरमध्ये किती चरबी घेणे योग्य मानले जाते?

डिनरमध्ये १०-१५ ग्रॅम चरबी पुरेशी आहे. हे प्रमाण पोटभरपणा देते आणि पचनाला त्रास देत नाही.

डिनरमध्ये जास्त चरबी घेतल्यास काय त्रास होऊ शकतात?

जास्त चरबीमुळे वजन वाढू शकते, अपचन, गॅस आणि हृदयरोगांचा धोका वाढतो, विशेषतः सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स असल्यास.

डिनरसाठी कोणत्या प्रकारच्या चरबीचा वापर करावा?

ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्समधून मिळणारी चरबी फायदेशीर आहे, जसे की सॅल्मन मासा, फ्लॅक्ससीड्स, चिया बिया आणि फिश ऑइल.

FSSAI चा RUCO (वापरलेले तेल) बाबतीत काय नियम आहे?

FSSAI च्या नियमानुसार, तेलातील टोटल पोलर कंपाऊंड्सचे प्रमाण २५% पेक्षा जास्त असू नये. त्यापेक्षा जास्त असल्यास ते तेल वापरणे धोकादायक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: जुलै महिन्याचा हप्ता कधी येणार? अधिकृत तारीख आली समोर

State Marathi Film Awards2025: मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा दणक्यात साजरा; कोणकोणत्या नामवंतांचा झाला गौरव? वाचा यादी

Nanded Crime:शिवसेना पदाधिकाऱ्याचा कारमाना;'स्पा सेंटर'च्या नावाखाली चालवायचा कुंटणखाना

Uttarakhand News : उत्तराखंडमध्ये ढगफुटी; नांदेडचे दहा पर्यटक अडकले, VIDEO

Mahadevi Elephant:'महादेवी'साठी मुख्यमंत्र्यांचा बैठकीत मोठा निर्णय; हत्तीणीसाठी कोल्हापूरकर रस्त्यावर

SCROLL FOR NEXT