BP Normal Range Google
लाईफस्टाईल

वयोमानानुसार किती असावं Blood pressure? महिला आणि पुरूषांसाठी प्रमाण वेगवेगळं, पाहा!

BP Normal Range: बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये रक्तदाबाची समस्या मोठ्या प्रमाणात सतावताना दिसतेय. उच्च रक्तदाबामुळे हृदयाच्या अनेक समस्या मागे लागतात. त्यामुळे वयोमानानुसार, रक्तदाबाची पातळी किती असली पाहिजे, हे जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलती जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे आजकाल तरूणांच्या मागे अनेक समस्या लागल्या आहेत. यामधील एक सतावणारी समस्या म्हणजे रक्तदाबाची समस्या. बहुतांश लोकांना उच्चरक्तदाबाचा त्रास असतो, तर काहींना लो बीपीचाही त्रास जाणवतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरातील अब्जावधी लोकांना रक्तदाबाशी संबंधित समस्या जाणवतात. जर आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर सामान्यपणे रक्तदाबाची पातळी काय असली पाहिजे हे जाणून घेणं महत्वाचे आहे. चला जाणून घेऊया महिला आणि पुरुषांमध्ये बीपीचं किती प्रमाण योग्य आहे.

आपल्या शरीरात रक्तदाब मोजण्याप्रमाणेच आपल्या वयानुसारही तो किती कमी - जास्त असावा याचा अंदाज लावता येतो. लहान वयात असताना मुलींचा रक्तदाब हा मुलांइतकाच असतो. मात्र पौगंडावस्थेनंतर मुलींचा रक्तदाब मुलांच्या तुलनेत थोडा कमी होतो.

महिलांमध्ये रक्तदाबाचं प्रमाण कसं असलं पाहिजे?

२१ ते ३१ वयोगटातील महिलांचा रक्तदाब हा ११५.५ ते ७०.५ असावा. यानंतर 31 ते 35 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये याचं प्रमाण ११०.५ आणि ७२.५ इतकं असतं. त्याचप्रमाणे ४० ते ५९ वयोगटातील महिलांमध्ये १२२/७४ बीपी सामान्य आहे आणि ६० वर्षांवरील महिलांमध्ये १३९/६८ बीपी सामान्य आहे.

वयोमानानुसार पुरुषांचा कसा असला पाहिजे रक्तबाद

महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये रक्तबादाची पातळी काहीशी जास्त असली पाहिजे. ३१ ते ३५ वर्षाच्या पुरुषांचा रक्तदाब ते ११४.५ ते ७५.५ दरम्यान असणं गरजेचं आहे. याशिवाय वयाच्या ४० नंतर, याचं प्रमाण वाढतं. या वयात १२४/७७ पर्यंत रक्तदाबाचं सामान्य मानलं जातं. ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये सामान्य बीपी १३३/६९ असणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link : 'मिसिंग लिंक'ला विरोध; लोणावळ्यातून प्रवेश देण्याची मनसेची मागणी

Ladki Bahin Yojana: e-KYC ची मुदत 30 एप्रिलला संपली; 54 लाख लाडक्या बहिणी अपात्र

HSC Result date: बारावीचा निकाल उद्या, या अधिकृत लिंकवर ऑनलाइन पाहता येणार, गुणपत्रिका डाउनलोड कशी कराल?

Maharashtra News Live Update: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत कोरेगाव शहरात तीन शाखांचे आणि एका संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन

Riteish Deshmukh: तुळजाभवानीच्या चरणी देशमुख कुटुंब! 'राजा शिवाजी'च्या यशासाठी रितेश-जेनेलियाने देवीचे दर्शन घेतले

SCROLL FOR NEXT