दारूच्या सेवनानंतर व्यक्तीच्या मेंदूमध्ये कसे होतात बदल? जाणून घ्या रंजक तथ्य

Side Effects of Alcohol on the Brain: अनेकांना दारू पिण्याची सवय असते. दारू पिणं हे आरोग्यासाठी धोकादायकच असतं. दारू प्यायल्यानंतर आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतो हे जाणून घेऊया.
Side Effects of Alcohol on the Brain
Side Effects of Alcohol on the Brainyandex
Published On

सध्याच्या तरूणाईचं पार्टी कल्चर असून यामध्ये मद्यपान करणं सामान्य गोष्ट आहे. घराबाहेर फिरायला गेल्यावर किंवा मित्रांसोबत अनेकजण मद्यपान करतात. काही लोकांना दारूचं इतकं व्यसन असतं, की त्यांना रात्री झोप देखील लागत नाही. या स्थितीचा तुमच्या हृदयावर, मनावर त्याचप्रमाणे शरीरावर गंभीर परिणाम होतो.

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, मद्यपान करणारे नक्कीच अल्कोहोलचे फायदे अतिशयोक्ती करतील. मात्र दारू पिण्यामुळे होणारे नुकसान कितीतरी पटीने जास्त आहे.

हृदयावर पडतात गंभीर परिणाम

हार्ट फेल्युअर असोसिएशन ऑफ द युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी (HFA-ESC 2022) नुसार, दारूच्या सेवनामुळे हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. त्याचप्रमाणे याचा परिणाम इतर अवयवांवर देखील परिणाम होतो.

दारू प्यायल्यानंतर ब्लड सर्कुलेशनवर कसा होतो परिणाम?

दारूच्या सेवनामुळे ब्लड सर्कुलेशनवर खूप गंभीर परिणाम होतो. हे मेंदूच्या कार्यावर आणि कार्य करण्याच्या पद्धतीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम करतं. दारूच्या सेवनामुळे मानसिक संतुलन, स्मृतिभ्रंश आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

न्यूरोन सिस्टमवर कसा होतो परिणाम?

दीर्घ कालावधीत जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने न्यूरॉन्समध्ये बदल होतात, जसं की त्यांचा आकार कमी होतो. प्रौढांच्या मेंदूपेक्षा तरुण व्यक्तींचे मेंदू अल्कोहोलच्या नकारात्मक प्रभावांना अधिक संवेदनशील असतात, असं संशोधनातून समोर आलं आहे. शिवाय अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com