

कॉरिडोरच्या कामासाठी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती.
कॉरिडोरच्या कामासाठी 3 हजार 993 कोटी 90 लाख रुपयांची आर्थिक तरतूद.
शिवसेना प्रमुखांची भाषा संजय राऊत यांना शोभत नाही
खरी शिवसेना अशीच आहे ही भाषा आम्ही करू
शिवसेनाप्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत.
शिंदेसेनेकडून खासदारांचं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर आता त्यांचा आमदारावर डोळा असून खासदारांच्या मागे आमदारही येणार असा दावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केलाय.शिंदे साहेबांचे नियोजन व्यवस्थित असतं, शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम त्यांच्याकडून होतंय.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने फुटीरवादी खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारून करण्यात आले निषेध आंदोलन
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयापासून जुनी धुळे महानगरपालिका कार्यालयापर्यंत काढण्यात आली निषेध रॅली
फुटीरवादी खासदारांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या विरोधात निषेधार्थ घोषणाबाजी करत खासदारांचा करण्यात आला निषेध
निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने ठाकरे सेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत निषेधार्थ घोषणाबाजी करत करण्यात आला निषेध
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 19 आणि 20 जून रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि इचलकरंजी परिसरात त्यांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 20 जूनला सकाळी कोल्हापुरातील पोलीस ग्राउंड इथं कृतज्ञता मिळावा आयोजित करण्यात आलेला आहे. केंद्राच्या वतीने कोल्हापूर तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी पंधराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी 140 कोटी रुपयांचा निधी वर्ग झाल्याने कोल्हापूरकरांच्यावतीने केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना धन्यवाद देण्यासाठी कृतज्ञता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेडच्या नांदेड ते मुखेड महामार्गावरील हळदा पाटी जवळ क्रांतिकारी शेतकरी संघटनेने टायर पेटून केले रास्ता रोको आंदोलन.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी बुलढाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरू.
अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) च्या कारवाहीच्या मुदातबाह्य खाद्यपदार्थ चक्क रस्त्यावर फेकले असल्याचा एक धक्कादायक प्रकार विरार मध्ये उघड झाला आहे.
विरार।पश्चिम आगाशी रोड परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्या वर बटर ची पॉकीट, नूडल्स पॉकीट रस्त्यावर उघड्यावर फेकून दिले आहेत.
हॉटेल चालक, किराणा दुकानदार व खाद्यपदार्थ विक्रेते अनेकवेळा रिसायकल करून, मुदत संपलेले खाद्यपदार्थ ग्राहकांना देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळतात.
नाशिक विधान परिषद निवडणूक अपडेट
नाशिक विधान परिषद निवडणुकीत एकूण 99.84% इतके झाले मतदान
नाशिक विधान परिषद निवडणुकीत 619 पैकी 618 मतदारांनी बजाविला मतदानाचा हक्क
जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रावर 616 मतदारांपैकी 614 सदस्यांनी केलं मतदान
जिल्ह्यातील 5 मतदान केंद्रावर 100 टक्के झाले मतदान तर उत्तर सोलापूर मतदार केंद्रावर 98.94 टक्के झाले मतदान
सोलापूर महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक रुद्रेश बोरामणी हे परदेशात असल्याने त्यांना मतदान करता आले नाही, तर प्रभाग क्रमांक २२ चे नगरसेवक दत्तात्रय नडगिरे यांच्या आकस्मिक निधनामुळे त्या प्रभागाचे मतदान होऊ शकले नाही.
कुर्डुवाडी 100%, अकलूज 100% मंगळवेढा100 टक्के, दक्षिण सोलापूर 100%, पंढरपूर 100% उत्तर सोलापूर मतदार केंद्रावर 99. 68 टक्के इतके झाले मतदान
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याविरोधात कोपरगावात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केले. वाकचौरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली तसेच पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. वाकचौरे हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. विविध ठिकाणी त्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असून, "उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक काय असतो ते दाखवून देऊ," असा इशारा युवा सेनेचे पदाधिकारी गगन हाडा यांनी दिला.
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम डाबचा राऊतपाडा गावात सातपुडा भागातील पहिल्या साकव पुलाचे लोकार्पण आमदार आमश्या पाडवी आणि जिल्हाधिकारी मिताली सेठी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. हा जिल्ह्यातील अशा प्रकारचा पहिलाच पूल ठरला आहे. पावसाळ्यात येथील स्थानिक नदीला पूर आल्यावर आदिवासी बांधवांचा जवळच्या गावांनी संपर्क तुटायचा. ग्रामस्थांना आणि शाळकरी मुलांना जीवघेणा प्रवास करत नदी ओलांडावी लागत असे. या समस्येची दखल घेत आमदार पाडवी यांच्या पाठपुराव्यातून हा पूल उभारण्यात आला आहे. या साकव पुलामुळे सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचा पावसाळ्यातील धोकादायक प्रवास थांबणार असून, त्यांचा दळणवळणाचा प्रश्न कायमचा मिटला आहे.
नांदेड विधान परिषद निवडणुकीत दुपारी 2 वाजेपर्यंत 88.94 टक्के मतदान
नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दुपारी 2 वाजेपर्यंत 88.94 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणुकीतील एकूण 452 मतदारांपैकी 402 सदस्यांनी दुपारी 2 वाजेपर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान शांततेत आणि सुरळीतपणे पार पडत असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून देण्यात आली. उर्वरित मतदारांकडूनही मतदानासाठी उपस्थिती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अडोशी बोगद्याजवळील धोकादायक दरड हटवण्याचे काम प्रशासनाने यशस्वीरित्या पूर्ण केले. किलोमीटर 41.100 दरम्यान सुरक्षाजाळ्यात अडकलेला मोठा दगड आणि त्यासोबतची माती व लहान-मोठे दगड काढण्यात आले. या कामासाठी सुमारे चार तास वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पावसाळ्यात संभाव्य अपघात टाळण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. दरडीचा मलबा हटवण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, लवकरच मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे.
- नाशिक विधानपरिषद निवडणूकीत दुपारी 2 वाजेपर्यंत 20.19 टक्के मतदान
- 619 पैकी 125 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
- मतदानासाठी आता शेवटचा दिड तास बाकी
- महायुतीचे सर्व नगरसेवक मतदान केंद्रावर दाखल
- सहलीवरून थेट मतदान केंद्रावर सर्व नगरसेवक दाखल
- मतदानाची प्रक्रिया सुरु
यवतमाळमध्ये ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक
यवतमाळमध्ये खासदार संजय देशमुखांचा पुतळा जाळून शिवसैनिकांनी केला निषेध
खासदार संजय देशमुख जिथे दिसला तिथे चोप देणार असल्याचा इशारा,यवतमाळ मधील शिवसैनिकांनी दिला आहे
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५२.२८ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. निवडणुकीसाठी एकूण ६३७ मतदार पात्र असून त्यापैकी ३३३ मतदारांनी दुपारी १२ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा, नारायणगाव पोलीस ठाणे व पारगाव पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत जबरी चोरी, चेन स्नॅचिंग आणि घरफोडी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत तब्बल 8 गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बीडच्या केज तालुक्यातील उमरी फाटा येथील विशाल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने रात्री अचानक धाड टाकून 6 लाख 68 हजार रुपयांचा भेसळयुक्त व असुरक्षित मुद्देमाल जप्त केला. कारखान्यात आढळलेली प्रचंड अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव आणि बिलांमधील त्रुटींमुळे डेअरीचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे.
- भंडारा-गोंदिया जिल्हा विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नरेश ईश्वरकर यांचा 'चमत्कारिक विजय' होईल, असा ठाम विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
- ही निवडणूक सर्वसामान्य जनतेची गळचेपी करणाऱ्या आणि 'माजलेल्या' हुकूमशाही सरकारविरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला.
खासदार संजय जाधव यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रह विभागाचे आदेश
खासदार संजय जाधव परभणी मध्ये दाखल झाल्या झाल्या सुरक्षा देण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश
घर आणि कार्यालयाच्या सुरक्षित देखील करण्यात आली आहे वाढ
नाशिक-मुंबई महामार्गावरील आर.सी. पाटील पुलावर ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेल्या महिलेचा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार भिवंडीकडून ठाण्याच्या दिशेने जात असताना ट्रकची धडक बसली. धडकेमुळे दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली आणि ट्रकच्या चाकाखाली आल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बैठकीला आले नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे संजय राऊत यांनी सांगितलेय.
शिरोळ तालुक्यातील शेतकरी पाणी प्रश्नावर आक्रमक झाले असून कोल्हापूर पाटबंधारे विभाग कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी करत धडक दिली आहे. उपसा सिंचन बंदी, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आणि सिंचन व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलनात्मक घेराव घालण्यात आला असून पाटबंधारे विभागाच्या भूमिकेविरोधात शेतकरी आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
- पळसे गावातील ३१ वर्षीय अनिकेत गायधनी याच्यावर कोयता आणि तलवारीने हल्ला
- दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हल्ल्याची घटना
- वाद मिटवण्यासाठी वास्को चौकात बोलावून घेतल्याचा आरोप
- बोलणी सुरू असतानाच शोएब शेख आणि साथीदारांकडून हल्ला
बारामती शहरातून जाणाऱ्या निरा डावा कालव्याचा पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत बारामती शहराला आता एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.. बारामती शहरात पिण्याच्या पाण्याचे तीन मोठे तलाव आहेत ते पूर्णपणे पाण्याने भरलेले आहे मात्र पावसाने ओढ दिली आहे.. पुढील काळात पाण्याची टंचाई भासू शकते यामुळे जोपर्यंत निरा डावा कॅनॉल चा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत हा निर्णय घेतला आहे
सोलापूर विधानपरिषद निवडणूक मतदान प्रक्रिया दरम्यान चेन वोटिंग होण्याची शक्यता महाविकास आघाडी उमेदवार वसंतराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
सोलापूर विधान परिषद पहिल्यांदा एकतर्फी वाटत होती मात्र निवडणूक शेवटच्या टप्प्यात चुरशीची झाली आहे. भाजपला क्रॉस वोटिंग होण्याची भीती आहे.
अल निनो च्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, यंदाचा १ जुलै चा ‘कृषी दिन’ हा नेहमीप्रमाणे साजरा न करता, विंधन विहिरी आणि पारंपरिक विहिरींमध्ये पाण्याचे पुनर्भरण करण्याचा विशेष कार्यक्रम राबवून साजरा केला जाणार आहे. त्यामुळे पाऊस लांबला तर नागरीकांना पाणी टंचाईची झळ कमी बसणार आहे. अल निनोच्या पाश्र्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हा उपक्रम राबवणार आहे.
सरसकट कर्जमुक्ती आणि पीकविम्यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक बनली असून रक्तातील साखरेची पातळी ५० पेक्षा कमी झाल्याने कोणत्याही क्षणी हायपोग्लायसेमिया होण्याचा धोका असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
अशक्तपणा, अंधारी येणे, उभे न राहता येणे आणि तीव्र डोकेदुखी अशी लक्षणे दिसत असतानाच किडनीवरही परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांनी आंदोलन मागे घेण्याचा सल्ला दिला असला तरी तुपकर यांनी स्पष्ट शब्दांत, "जीव गेला तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही," अशी भूमिका घेत सरकारवर निशाणा साधला आहे.
दिल्लीमध्ये किती खासदार पोहचले माहिती नाही
लोकशाही म्हणजे थट्टा वाटते का?
व्हीप पाळला नाही तर कायदेशीर कारवाई करणार
तुम्हाला धडा शिकवून तुरुंगात जाऊ
महाराष्ट्रात कुणी बेईमानी केली तर सोडायचे नाही
त्यांच्या मतदारसंघात राडे करायचे
परभणीचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत इतर काही खासदारांसह स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. संजय जाधव हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच पोलीस प्रशासनाने त्यांच्या घराची आणि कार्यालयाची सुरक्षा वाढवली आहे. निवासस्थानी आणि कार्यालयावर पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड तैनात करण्यात आले असून, परभणीतील शिवसैनिकांमध्ये मात्र या घडामोडींमुळे नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्याप्रकरणी शालन शिंदे जेलमध्ये आहेत
- आज विधान परिषदेसाठी पोलीस बंदोबस्तात शालन शिंदे यांना आणण्यात आले
- दरम्यान नगरसेवक अनंत जाधव आणि सभागृह येथे नरेंद्र काळे यांनी शालन शिंदे यांना मतदान प्रक्रिया समजावली
- नगरसेविका शालन शिंदे यांनी मतदान केल्यानंतर पुन्हा पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले
काँग्रेस नगरसेवकांसाठी काँग्रेसच्या गटनेत्यांनी काढलेल्या पत्राला काँग्रेस नगरसेवकांकडून केराची टोपली...
अमरावती शहरातील काँग्रेस नगरसेवकांनी तटस्थ राहण्याचे आदेश असताना काँग्रेसचे नगरसेवक मतदानासाठी दाखल....
आतापर्यंत काँगेसच्या नगरसेवकांनी केलं मतदान.
जळगाव विधान परिषद निवडणुकीतील एका जागेसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान सुरू असून संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. या निवडणुकीत एकूण ६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये ३१५ पुरुष आणि ३१५ महिला मतदारांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती सभागृहामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या मतदानाच्या ठिकाणी मतदारांना कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिली नाही. जखमी अपघातग्रस्त असलेल्या महानगरपालिकेच्या नगरसेविका या मतदानला आल्या, त्यावेळेस त्यांना खुर्चीत बसवून उचलून आणावं लागलं. व्हीलचेअरची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करायला हवी होती पण तीही केली नाही. त्यामुळं संताप व्यक्त केला गेलाय. पोलीस कर्मचाऱ्यांनाही पाणी व्यवस्था केली नसल्यानं नाराज व्यक्त केली. मतमोजणी केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचारी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निकृष्ट दर्जाचा नाश्ता दिल्यामुळे नाराजी व्यक्त केली गेली.
धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची पक्षप्रवेशाबाबत वेट अँड वॉचची भूमिका
कोर्टाचा निकाल लागेपर्यंत खासदार ओमराजे निंबाळकर कोणतीच भूमिका घेणार नाहीत
वीस तारखेच्या निकालानंतर मी माझी भूमिका अधिकृतपणे जाहीर करणार ओमराजे निंबाळकर यांचे सुतोवाच
ओमराजे यांच्या या भूमिकेवरून ओमराजे निंबाळकर आजच्या दिल्लीतील पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची चिन्ह
साम टिव्हीला विश्वसनीय सूत्रांची माहीती
शिरूर पोलीस स्टेशनच्या 'डीबी' पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख २४ हजार रुपये किमतीची ३ गावठी पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.न्हावरे गावच्या हद्दीत संशयित विजय ऊर्फ कोयत्या गोविंद शेंडगे (वय ३१, रा. आमदाबाद) हा पिस्तूल घेऊन फिरत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या कमरेला १ पिस्तूल व २ जिवंत काडतुसे सापडली. पुढील तपासात बापू कोंडीबा पारखे (वय ३१, रा. निमोणे) याने त्याला शस्त्रे पुरवल्याचे निष्पन्न झाले.
लातूर बीड धाराशिव या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद मतदान प्रक्रियेला सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे, या मतदार संघात महायुती कडून बसवराज पाटील रिंगणात आहेत, महाविकास आघाडी कडून, महेश देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत, लातूर जिल्ह्यातून एकूण 367 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आली, सकाळी आठ वाजल्यापासून चार वाजेपर्यंत हे मतदान प्रक्रिया पार पडेल.
मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समितीची स्थापना
मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार, अर्थ, कृषी आणि सहकार खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांचा असणार समितीत समावेश
भंडारा - गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी भंडाऱ्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. अगदी पहिलं मतदान महाविकास आघाडीच्या मतदारांनी पहिलं मतदानाचा हक्क बजावलाय. काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मोहन पंचभाई, देवा इलमे, प्रेम वणवे या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरवात झाली आहे.. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला आहे.भाजपाकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप मैदानात आहेत.. तर किशोर धुमाळे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.. सांगली सातारा एकूण ८९५ इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून ४२३ इतकी मतदार संख्या सांगली जिल्ह्यातील आहे.
पुणे आणि शिर्डी दरम्यान दररोज धावणारी नवीन रेल्वे बुधवारपासून सुरू झाली आहे गाडी क्रमांक 11423 पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस पुणे स्थानकावरून सकाळी ६:५५ वाजता सुटून दौंड श्रीगोंदा अहिल्यानगर राहुरी आणि बेलापूर मार्गे दुपारी १२ वाजता शिर्डी येथे पोहोचेल.
परतीची ११४२४ साईनगर शिर्डी पुणे एक्सप्रेस शिर्डीहून संध्याकाळी ६.१० वाजता सुटून बेलापूर राहुरी अहिल्यानगर श्रीगोंदा रस्ता आणि दौंड स्थानकावर थांबे घेत रात्री ११.५५ वाजता पुण्यात येईल.
अमरावती शहर काँग्रेसने अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये तटस्थ राहण्याची घेतली भूमिका...
महानगरपालिकेचे 17 ही नगरसेवक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही..
काँग्रेसने सगळ्यांही नगरसेवकांना व्हीप जारी करून दिले आदेश...
मात्र यावेळी ग्रामीण मधील काँग्रेसच्या कोणत्याही नगरसेवकांना व्हीप जारी केले नाही..
यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख हे शिंदेसेनेत जणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.त्यामुळे त्यांच्या चिंचोली येथील निवासस्थाना बाहेर शुकशुकाट असून पोलिसांचा बंदोबस्त काय आहे.
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण 895 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी महायुतीचे धैर्यशील कदम, महाविकास आघाडीचे अभय जगताप अशी दुरंगी लढत होत असून अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ हे देशील आपले नशीब आजमावत आहेत.
उस्मानाबाद लातूर बीड विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून मतदारसंघातील एकूण 988 मतदार मतदानाचा हक्क बजावतील तर जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रावर 317 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाने देखील मोठी तयारी केली आहे.मतदान केंद्रावर मतदारांना पेन मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.