डीलिमिटेशन बिलाच्या मंजुरीसाठी ठाकरेसेना फोडली? 2029च्या निवडणुकांसाठी भाजपची रणनीती?

Maharashtra politics : देशात खासदारांच्या फुटीचं सत्र काही थांबण्याचं नाव नाही... तृणमूल काँग्रेसनंतर ठाकरेसेनेतील खासदार फुटल्यानं आता पुढचा नंबर कोणाचा असा प्रश्न उपस्थित होतोय..मात्र खासदारांची ही फुट नेमकी का होतेय? डीलिमिटेशन आणि खासदारांच्या फुटीमागे नेमकं काय कनेक्शन आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Maharashtra political News
maharashtra politics Saam tv
Published On

राज्यात 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला... ठाकरेसेनेचे तब्बल 6 खासदार फोडले..त्याआधी तृणमूलच्या 20 खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत वेगळा गट स्थापन केला.. त्यामुळे देशात खासदारांच्या फोडाफोडीचं राजकारण नेमकं का सुरु झालयं? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मात्र डीलिमिटेशन विधेयकाच्या मंजुरीसाठी पुरेसे संख्याबळ गोळा करण्यासाठी भाजप प्रादेशिक पक्षांना फोडत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आणि काँग्रेसनं केलाय...

दुसरीकडे विरोधी पक्षातील नेत्यांना, खासदार-आमदारांना धमक्या आणि पैशांचे आमिष दाखवून सत्तेमध्ये सामावून घेतलं जातंय, ज्यामुळे पुढच्या काळात लोकशाहीच धोक्यात येणार असल्याचा दावा जलील यांनी केलाय. एवढंच नव्हे तर 2029ची निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल असा दावा त्यांनी केलाय.. त्यालाच ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवेंनी दुजोरा दिलाय.. मात्र हे सर्व आरोप नैराश्यातून होतायंत असा टोला भाजप नेत्यांनी लगावलाय.

दरम्यान खासदारांच्या फुटीचा मुद्दा फक्त ठाकरेसेना आणि तृणमूलपुरता मर्यादित नाही... तर 2027 च्या निवडणुकीआधी उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षातही मोठी फुट पडणार असल्याचा दावा योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओम प्रकाश राजभर यांनी केलाय...सपाचे 26 खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातयं...

एकंदरित देशाच्या राजकारणातील पुढील काही महिने वेगवेगळ्या पक्षातील खासदार फुटण्याची शक्यता वर्तवली जातेय...आणि याला कारण आहे...डीलिमिटेशन विधेयक...संसदीय अधिवेशनात वादाचा मुद्दा ठरलेलं हे विधेयक इंडिया आघाडीच्या एकीमुळे गेल्यावेळी नामंजूर झालं होतं.

Maharashtra political News
भारतात २०२९ साली शेवटची निवडणूक होणार; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

डीलिमिटेशनच्या बाजूनं 298 तर विरोधात 230 मतं पडली... मात्र डीलिमिटेशनचे विधेयक मंजूर होण्यासाठी 360 मतं आवश्यक होती...त्यामुळे डीलिमिटेशनसाठी 62 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे... अशातच तृणमूलचे 20 आणि ठाकरेसेनेचे 6 खासदार फोडल्यानं 26 खासदारांचा NDAला पाठिंबा मिळणार आहे...

Maharashtra political News
भारतात २०२९ साली शेवटची निवडणूक होणार; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुळात 54 मतं कमी पडल्यामुळे डीलिमिटेशनचे विधेयक मंजुर झाले नव्हते.. मात्र आता खासदारांच्या फुटीतून डीलिमिटेशन विधेयक मंजुरीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची चर्चा आहे .. आता डीलिमिटेशनसाठी आवश्यक असलेले संख्याबळ गाठण्यासाठी NDA नेमकं काय करणार? विरोधक खासदारांची ही फुट कशी रोखणार? याकडे देशाचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com