Alcohol stay in body SAAM TV
लाईफस्टाईल

Alcohol stay in body: दारू प्यायल्यानंतर तुमच्या शरीरात किती वेळ अल्कोहोल राहतं? डॉक्टरांनी दिली आश्चर्यकारक माहिती

How long alcohol lasts: मद्यपानानंतर शरीरात अल्कोहोल किती वेळ राहते याबद्दल अनेकांना शंका असते. डॉक्टरांच्या मते, अल्कोहोलचे प्रमाण शरीरात बराच काळ टिकते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो.

Surabhi Jayashree Jagdish

भारतात दारू पिणाऱ्यांचं प्रमाण कमी नाही. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, दारू आपल्या शरीरात किती काळ राहते. म्हणजेच दारू पिणाऱ्या व्यक्तीला शुद्धीवर येण्यासाठी किती वेळ लागतो. मुळात याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. लिंबू पाणी किंवा काही आंबट खाल्लं की दारू उतरते असं म्हणतात. पण यामध्ये किती तथ्य आहे

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात दारू किती वेळ राहते हे पूर्णपणे त्याची प्रकृती, आरोग्य आणि त्याला असलेल्या सवयींवर अवलंबून आहे. दारू पूर्णपणे शरीरातून बाहेर टाकण्यासाठी साधारपणे five half-lives लागतात. दारूचं हाफ-लाईफ चार ते पाच तासांचं असतं. याचाच अर्थ शरीराला ती पूर्णपणे बाहेर टाकण्यासाठी २० ते २५ तासांचा कालावधी लागू शकतो.

दारूचं मेटाबॉलिझम कसं असतं?

ऑस्टिनच्या केअरहाईव्ह हेल्थच्या आपत्कालीन विभागातील डॉक्टर आणि वैद्यकीय संचालक डॉ. सुनीत सिंग यांनी दारू शरीरात गेल्यावर कशी प्रक्रिया सुरु होते हे समजावून सांगितलं आहे.

द इकोनॉमिक्स टाईम्सला माहिती देताना डॉ. सुनित सिंग यांनी सांगितलं की, दारू शरीरात गेल्यानंतर ती बाहेर पडण्यापर्यंतचा प्रवास हा मेटाबॉलिझम प्रक्रियेतून जातो. ही प्रक्रिया पोटात सुरू होते. जिथे वेगवेगळे एन्झाईम्स दारूचे विघटन सुरू करतात.

दारूचं अधिक प्रमाण हे थेट लहान आतड्यात जातं आणि तिथून रक्ताद्वारे शोषलं जातं. रक्तात गेल्यानंतर दारू यकृतात पोहोचते. या ठिकाणी दारूचं ९०% पेक्षा जास्त मेटाबॉलिझम होतं. यकृतच मुख्य काम करतं. दारू यकृतात पोहोचल्यावर ती अॅसिटाल्डिहाइडमध्ये बदलते ज्यामुळे मळमळ, डोकेदुखी आणि हृदयाचे ठोके वाढणं असे त्रास होतात.

एका ड्रिंकमध्ये (बिअर, वाईन किंवा शॉट) दारू रक्तात गेल्यानंतर साधारण एका तासात पीकवर पोहोचते. त्यानंतर ती पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी शरीराला अजूनही २० ते २५ तास लागतात.

डॉ. सिंग यांनी स्पष्ट केलं की, एका ड्रिंकला शरीरातून पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी एक दिवस लागतो. मुळात यकृताला फरक पडत नाही की तुम्ही बिअर, वाईन किंवा कॉकटेल पियात. यकृत त्याची प्रक्रिया दारू म्हणूनच करतं.

दारू शरीरात गेल्यावर काय होतं?

  • दारूचे अंश रक्तात साधारणपणे 12 तासांपर्यंत आढळू शकतात.

  • ब्रिथ अ‍ॅनालायझरद्वारे श्वासातून दारूची उपस्थिती 12 ते 24 तासांपर्यंत ओळखता येऊ शकते.

  • लघवीमध्ये दारूचे अंश 12 ते 72 तासांपर्यंत आढळण्याची शक्यता असते.

  • लाळेद्वारे दारूचे 12 ते 48 तासांपर्यंत कळण्याची शक्यता असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आधी पायाखाली चिरडलं, नंतर सोंडेने उचलून आपटलं; हत्तीसोबत सेल्फी घेणं तरुणाच्या जीवावर बेतलं

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

Maharashtra Live News Update: संभाजीनगर मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटप बैठकीला सुरुवात

Skin Care: सॉफ्ट आणि फ्रेश चेहरा हवाय? मग रोज तुमच्या सोयीनुसार ५ मिनिटांसाठी फॉलो करा 'हा' उपाय

मित्रानेच काटा काढला! २६ वर्षाच्या निलेशचा खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन् जंगलात फेकला

SCROLL FOR NEXT