Drinking water with a meal saam tv
लाईफस्टाईल

Water after meals: जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे? पाहा आयुर्वेद काय सांगतं?

Drinking water with a meal: जेवण करत असताना पाणी प्यावं की नाही, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. यामध्ये काही जण जेवणाअगोदर पाणी पितात तर काही जण जेवणानंतर पाणी पितात. मात्र जेवण आणि पाणी याबाबत आयुर्वेद काय सांगतो हे पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

काही लोकं जेवताना पाणी पितात, तर काही जणं जेवण्यापूर्वी पाणी पितात. इतकंच नाही तर काहींना जेवणानंतरही पाणी प्यायची सवय असते. मात्र तुम्हाला माहितीये का जेवताना किंवा जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास तुम्हाला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊया जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे?

30 मिनिटांनी प्यावं पाणी

आयुर्वेदात म्हटल्यानुसार, तुम्हाला जेवणापूर्वी कमीत कमी २०-३० मिनिटं आधी पाणी प्यायलं पाहिजे. जर तुम्ही जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी पीत असाल तर तुमच्या पचनक्रियेवर त्याचा वाईट परिणाम होत नाही. म्हणजेच तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम डिस्टर्ब होत नाही. त्यामुळे जेवणानंतर लगेच पाणी पिणं टाळावं.

जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास काय होतं?

खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास त्याचा तुमच्या गट हेल्थवर परिणाम होतो. यामुळे तुम्हाला पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसंच जेवल्यानंतर तातडीने पाणी प्यायल्यास तुमच्या पचनक्रियेची प्रोसेस हळू होते. त्यामुळे आयुर्वेदात खाल्लानंतर लगेच पाणी पिऊ नये.

या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या

आयुर्वेदानुसार, जेवत असताना तुम्ही अन्न योग्य पद्धतीने चावलं पाहिजे. जर तुम्ही मोठे घा, घेऊन पटापट गिळत असाल तर तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. यामुळे गट हेल्थवर परिणाम होत असून इतर पोटाच्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. जेवणाचं योग्य पद्धतीने पचन हवं असल्यास झोप आणि जेवणामध्ये २-३ तासांचं अंतर ठेवावं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT