Quit Chapati: महिनाभर चपाती न खाल्ली नाही तर? पाहा शरीरामध्ये कसे बदल होतात

30 Days Without Wheat: गव्हाच्या चपातीचं सेवन पचनक्रियेसाठी फायदेशीर मानलं जातं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जर तुम्ही एक महिना चपाती खाणं पूर्णपणे थांबवलं तर तुमच्या शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात?
Quit Chapati
Quit Chapatisaam tv
Published On

जवळपास भारतातील सर्व घरांमध्ये जेवणामध्ये चपातीचा वापर केला आहे. काही घरांमध्ये चपातीशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. कॅल्शियम आणि प्रोटीन असलेली ही चपाती तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते.

गव्हाच्या चपातीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते असं म्हटलं जातं. मात्र तुम्हाला माहितीये का जर तुम्ही एक महिना चपाती खाल्ली नाही तर काय होऊ शकतं. चला जाणून घेऊया एक महिना गव्हाची चपाती खाणं बंद केलं तर तुमच्या शरीरात काय बदल होतात.

Quit Chapati
Stomach Cancer: पोटाच्या कॅन्सरपूर्वी महिलांच्या शरीरात दिसतात 'हे' बदल; अजिबात दुर्लक्ष करू नका

वजन कमी

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही एक महिना गव्हाची चपाती खाल्ली नाही तर तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. गव्हाचं पीठ हे तुमचं वजन वाढण्यास कारणीभूत ठरतं.

साखरेची पातळी

गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे जर पूर्ण एक महिना तुम्ही याचं सेवन करणं सोडलं तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्तींनी याचं सेवन कमी केलं पाहिजे.

Quit Chapati
Health Tips: लघवीमध्ये 'हे' बदल दिसल्यास समजा किडनी होतेय खराब; अजिबात दुर्लक्ष करू नका

ऊर्जा

गव्हापासून बनवलेल्या चपातीमध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त असतं. यामुळे थकवा वाढू लागतो. अशावेळी 1 महिना या चपातीचं सेवन न केल्याने शरीरात एनर्जी येते.

हृदयाचे आजार

चपातीमध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट्सच्या प्रमाणाने हृदय रोगाचा आजार देखील वाढू शकतो. अशावेळी १ महिना गव्हाच्या चपातीचं सेवन न केल्यास तुम्ही या समस्या टाळू शकता.

Quit Chapati
Quit White Rice: महिनाभर पांढरा भात खाणं सोडलं तर? पाहा शरीरावर काय होतो परिणाम?

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com