Quit White Rice: महिनाभर पांढरा भात खाणं सोडलं तर? पाहा शरीरावर काय होतो परिणाम?

Quit White Rice Challenge: भात खाल्ल्याशिवाय अनेकांचं मन तृप्त होत नाही. आपण एक महिना भात खाणं सोडल्यास त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, याची तुम्हाला कल्पना आहे का?
Benefits of Quitting White Rice
Quit White Ricesaam tv
Published On

आपल्यापैकी अनेकांना भात खाण्यास खूप आवडतो. बऱ्याचदा रात्रीचं जेवण भाताशिवाय पूर्णच होत नाही. भातसाठी तांदळाचा वापर होतो. याशिवाय तांदूळ हे फोडणीची भात, बिर्याणी, इडली तसंच डोसा यांच्यासाठी वापरला जातो.

भात खाल्ल्याशिवाय अनेकांचं मन तृप्त होत नाही. काहींच्या म्हणण्यानुसार, भाताचं सेवन केल्याने वजनात देखील वाढ होते. मात्र आपण एक महिना भात खाणं सोडल्यास त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो, याची तुम्हाला कल्पना आहे का? जाणून घेऊया भात खाणं सोडल्यास काय होऊ शकतं.

महिनाभर पांढरा भात न खाल्ल्यास काय होईल?

न्यूट्रीशनची कमतरता

आहारतज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, पांढऱ्या तांदळामध्ये जीवनसत्त्वं आणि खनिजांचं प्रमाण जास्त असतं. पौष्टिक घटक म्हणून हे खूप महत्त्वाचं असतं. अशातच महिनाभर पांढरा भात खाल्ला नाही तर तुमच्या शरीरात अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांची कमतरता भासू शकणार आहे. ज्यामुळे अशक्तपणा, आळस येऊ शकतो.

वजन कमी होणं

बरेच लोक वजन कमी करण्यासाठी भात खाणं टाळतात. अनेकांना याचा परिणामही दिसून येतो. पांढऱ्या तांदळात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण असतं. जे तुमच्या शरीराला ऊर्जा देतात. जर आपण हे महिनाभर खाल्लं नाही तर वजन कमी होऊ शकतं. मात्र याचा एक विपरीत परिणाम देखील होतो, तो म्हणजे तुमच्या शरीरात सुस्ती वाढू शकते.

पचनात अडचणी येणं

पांढरा तांदूळ हा फायबरचा एक उत्तम स्रोत मानला जातो. पांढऱ्या तांदळाचा भात खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता, गॅस आणि पोट फुगणं यांसारख्या समस्यांचा धोका वाढूतो.

पांढरा तांदूळ हा आपल्या आहाराच्या सवयींचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे याचं सेवन टाळल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे आपल्या शरीराला कमी प्रमाणात पोषण मिळतं. त्यामुळे पांढरा भात खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com