वजन कमी करण्यासाठी धावणे की चालणे, काय योग्य? Freepik
लाईफस्टाईल

Calorie Burning Workouts: वजन घटवण्यासाठी किती वेगाने चाललं पाहिजे? जाणून घ्या कॅलरी लॉसचं संपूर्ण गणित

Walking speed for fat burning: वजन कमी करण्यासाठी चालणे हा सर्वात सोपा, सुरक्षित आणि प्रभावी व्यायाम आहे. पण नुसते चालणे पुरेसे नाही, तर तुम्ही किती वेगाने चालता आणि किती वेळ चालता हे महत्त्वाचे आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल लठ्ठपणामुळे अनेक लोक त्रस्त आहेत. शरीरात अतिरिक्त चरबी जमा झाल्याने हृदयविकार, मधुमेह, सांध्यांचे त्रास अशा अनेक आजारांची शक्यता वाढते. त्यामुळे लोक वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करतात. काहीजण औषधं घेतात, तर काही रोज सकाळ-संध्याकाळ चालण्याची सवय लावतात.

जर तुम्हीसुद्धा चालून वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर किती वेगाने चालल्यास चरबी लवकर बर्न होते आणि वजन कमी होण्यास मदत होते, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

किती वेगाने चालणं परिणामकारक ठरतं?

पायी चालणं हे केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर स्नायूंच्या वाढीसाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करायचं असेल तर सामान्य चालण्याचा वेग ताशी 3 ते 4 किमी असावा, पण या गतीत कॅलरी बर्न तुलनेने कमी प्रमाणात होते.

ब्रिस्क वॉकिंग म्हणजेच मध्यम वेगाने चालण्यामध्ये गती ताशी 5 ते 6 किमी इतकी असावी. वजन कमी करण्यासाठी ही गती आदर्श मानली जाते. त्यापुढे ‘पॉवर वॉकिंग’ येतं, ज्यात चालण्याचा वेग ताशी 6 ते 7 किमी असतो. ही पद्धत अधिक कॅलरी बर्न करण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते.

कॅलरी बर्नचं गणित

जर एखाद्या व्यक्तीचं वजन सुमारे 60 किलो असेल आणि ती व्यक्ती एका तासात 5 किमी चालली, तर साधारण 200 ते 220 कॅलरी बर्न होतात. जर वजन 70 किलो असेल, तर 250 ते 260 कॅलरी आणि 80 किलो वजन असल्यास 300 ते 320 कॅलरीपर्यंत बर्न होऊ शकते.

हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशन (2021) नुसार, 70 किलो वजन असलेली व्यक्ती 6 किमी प्रतितास या गतीने चालल्यास सुमारे 150 कॅलरी बर्न करू शकते.

1 किलो चरबी कमी करण्यासाठी सुमारे 7700 कॅलरी बर्न कराव्या लागतात. जर तुम्ही रोज चालून 250 ते 300 कॅलरी बर्न करत असाल तर 20 ते 25 दिवसांत तुम्ही साधारण 1 किलो वजन कमी करू शकता. मात्र हा परिणाम तुमच्या आहारावरही पूर्णपणे अवलंबून असतो. चालणं आणि आहार यांचा समतोल साधल्यास वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी बनते.

वेगाने चालण्याचे अतिरिक्त फायदे

वेगाने चालल्याने केवळ चरबीच बर्न होत नाही, तर शरीराचा मेटाबॉलिझम एक्टिव्ह राहतं. त्यामुळे चरबी कमी होण्याची गती वाढते. हे हृदय आणि फुफ्फुसांसाठीही फायदेशीर ठरतं. त्यामुळे दररोज किमान 30 ते 60 मिनिटं चालण्याचं लक्ष ठेवणं वजन नियंत्रणासोबतच एकूण आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:यवतमाळ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

Uddhav Thackeray: निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस आणि सत्तेचा माज; उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

Mega block News : रेल्वे प्रवाशांनो, रविवारी वेळापत्रक बघूनच बाहेर पडा; मध्य-हार्बर, ट्रान्सहार्बरवर कसं असेल नियोजन, वाचा

Amsul Sar Recipe: सर्दी खोकल्यानं हैराण झालात? मग आमसूलाचा वाटीभर सार एकचा टेस्ट करून पाहाच

Health Tips: झोपण्यापूर्वी पाय धुण्याचे आश्चर्यकारक फायदे काय?

SCROLL FOR NEXT