Aishwarya Narkar : "बॉलिवूड पेक्षा भारी..."; ऐश्वर्या नारकरचा नवऱ्यासोबत ट्रेंडिंग गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO पाहिलात?

Aishwarya-Avinash Narkar Dance Video : मराठीतील क्यूट कपल ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर पुन्हा आपली भन्नाट डान्स रील घेऊन आले आहे. त्याची केमिस्ट्री पाहून चाहते त्यांना "बॉलिवूड पेक्षा भारी" म्हणत कौतुक करत आहेत.
Aishwarya-Avinash Narkar Dance Video
Aishwarya Narkarsaam tv
Published On
Summary

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी ट्रेंडिंग गाण्यावर डान्स केला आहे.

ऐश्वर्या आणि अविनाश हे मराठी मनोरंजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहे.

त्यांच्या डान्स रीलवर नेटकरू भरभरून कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अलिकडेच त्यांच्या योगा व्हिडीओमुळे त्यांना ट्रोल करण्यात आले होते. यावर अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्यांची चांगली शाळा घेतली होती. ऐश्वर्या नारकर यांना कपड्यावरून ट्रोल करण्यात आले होते. अशात आता ऐश्वर्या नारकर यांनी पुन्हा एकदा भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. ऐश्वर्या नारकर आणि त्यांचे पती अविनाश नारकर कायम त्यांच्या डान्स रीलमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी भन्नाट डान्स रील शेअर केली आहे. जी पाहून चाहते त्यांचे भरभरून कौतुक करत आहेत.

व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar) ट्रेंडिंग गाण्यांवर थिरकताना दिसत आहेत. "पोरी हलु हलु नाच" या गाण्यावर त्यांनी भन्नाट डान्स केला आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर खूप ट्रेडिंग पाहायला मिळत आहे. ऐश्वर्या नारकर यांनी निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट कुर्ता परिधान केला आहे. ज्यावर लाल आणि पांढऱ्या रंगाची फुले पाहायला मिळत आहे. तर अविनाश यांनी गोवा स्टाइल शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे. डोळ्याला गॉगल लावून अभिनेते खूपच डॅशिंग दिसत आहेत. या व्हिडीओवर ऐश्वर्या यांनी हटके कॅप्शन दिले आहे. त्यांनी लिहिलं की," The Hero"

चाहत्यांच्या कमेंट्स

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहे. त्यांच्या केमिस्ट्रीचे आणि डान्सचे भरभरून कौतुक करत आहे. "मराठी जोडी 100 बॉलिवूड पेक्षा भारी", "हिरो तुमचा एक नंबर आहे", "कमाल", "माझी फेव्हरेट जोडी", "लय भारी", "अजून हवंच काय आयुष्यात, एक हिरो आणि हलू हूल नाच...", "जीवनाचा खरा आनंद, दोघांनी आनंदी असणे आनंद घेणे हाच असतो " अशा अनेक कमेंट्स येत आहेत.

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर सध्या 'शेवग्याच्या शेंगा' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्याच्या या नाटकाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या जोडीने आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच अविनाश नारकर सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत झळकत आहेत.

Aishwarya-Avinash Narkar Dance Video
Suraj Chavan Video : "माझं इतकं मन दुखलंय ना..."; सूरज चव्हाणनं व्यक्त केली नाराजी, 'ती' एक गोष्ट गुलीगत किंगच्या जीवाला लागली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com