Anti Aging Breakfast Tips : वयाच्या चाळीशीत तरुण अन् फीट राहण्यासाठी भन्नाट टिप्स, नाश्त्यात खा फक्त 'हे' ३ पदार्थ

Healthy Lifestyle: वाढत्या वयात महिलांची तरुण त्वचा हरवून जाते. चेहऱ्यावर सतत टेंशन आणि कामाचा ताण दिसतो. अशा वेळेस तुम्ही काही सोप्या पद्धतीने तुमचे सौंदर्य परत मिळवू शकता.
Anti Aging Breakfast Tips
Stay Young After 40 google
Published On

तरुणपणी तुम्ही योग्य आहार आणि योग्य व्यायाम करत असाल तर तुम्हाला वृद्धपणी फार समस्यांना सामोरं जावं लागत नाही. पण काही महिलांना त्यांच्या तिशीतच वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात. यावर उपाय म्हणजे तुमचा सकाळचा नाश्ताच आहे. तुम्ही सकाळी योग्य प्रमाणात आणि योग्य पदार्थांचा नाश्ता केलात तर तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो. त्याने मेंदू, त्वचा, व्यायाम अशा अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते.

सकाळचा नाश्ता जर व्यवस्थित असेल तर तुम्ही टवटवीत दिसता, मेंदू फ्रेश होतो, दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. तसेच तुम्हाला तरूण दिसण्यासाठी सुद्धा नाश्ता फायदेशीर ठरतो. पुढे आपण ३० ते ४० वयोगटातील महिलांनी कोणता आहार घेतला पाहिजे याबद्दल जाणून घेणार आहोत.

१. नाश्त्यात अ‍ॅंटीऑक्सिडेंट्स असणे. (Your daily dose of antioxidants)

तुमच्या नाश्त्यात असे पदार्थ निवडा ज्यात अ‍ॅंडीऑक्सिडेंट्सचे प्रमाण जास्त असते. जसे की, ब्लुबेरीज, स्ट्रॉबेरीज, रास्पबेरीज आणि ब्लॅकबॅरीज. तुम्ही अशा बेरीज नाश्त्यात सेवन केल्याने तुमच्या शरीराला व्हिटॅमिन सी, ऊर्जा, ग्लोइंग स्कीन आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी बेरीज फायदेशीर ठरतील.

२. ड्रायफ्रुट्स आणि बिया. (Nuts and Seeds)

ड्रायफ्रुट्समध्ये काजू, बदाम, अक्रोड, चिया सीड्स, भोपळ्याच्या बिया, जवसाच्या बिया यांचा समावेश असतो. हे ड्रायफ्रुट्स चाळीशीतल्या महिलांसाठी इन्मुनिटीचे घरचं असते. ड्रायफ्रुट्समध्ये ओमेगा ३ चे फॅटी अ‍ॅसिड्स असतात. हे मेंदुच्या कार्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. तसेच सांध्याच्या अडचणी सुद्धा यामध्ये कमी होतात. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यात दहीसोबत, स्मुदीसोबत किंवा असचं खाऊ शकता.

३. मासांहार

३० ते ४० गटातील महिलांच्या आठवड्याच्या खाण्यात मच्छीचा समावेश असायला हवा. त्यामध्ये रुई किंवा सुरमई अशा ओमेगा ३ सारख्या फॅटी अॅसिडचा समावेश असणे महत्वाचे आहे. याने तुमच्या स्कीनला नॅचरल पद्धतीने मॉइश्चराइझर मिळतं. तुम्ही या मच्छी वाफवून किंवा कमीत कमी तेलात तळून हिरव्या पालेभाज्यांसोबत खाऊ शकता.

Anti Aging Breakfast Tips
Paralysis ची लक्षणे कोणती? जाणून घ्या एका क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com