Saam Tv
शरीराच्या कोणत्याही भागात कमकुवतपणा किंवा स्नायुंचा त्रास जाणवायला लागला की तुम्ही सावध होणं गरजेचं आहे.
तुम्हाला जर सुन्न पणा किंवा हातापायात मुंग्या येण्याच्या समस्या जाणवत असतील तर हे लक्षण लकव्याचे असू शकते.
लकवा किंवा अर्धांगवायू हा मेंदूपर्यंत रक्तपुरवठा न झाल्यामुळे होतो. त्याने शरीराची एक बाजू कमजोर होते.
अचानक तीव्र डोकं दुखतं असेल तर डॉक्टरांकडे जावून तपासणी करा.
हसताना किंवा बोलताना चेहऱ्याचा एक भाग अचानक सुन्न पडत असेल तर हे लक्षण लकव्याचे असू शकते.
तुम्हाला शब्द उच्चारताना जड वाटत असेल किंवा संभाषणात गोंधळ होणे.
डोळ्यांवर अचानक अंधार येणे किंवा कमी दिसणं.
तुम्हाला न थकता किंवा न काम करता चक्कर येणे हे लक्षण लकव्याचे असू शकते.